E C A M I N D I A

Regions

इकॅम कोकण विभागाचा इतिहास

इकॅमचा कोकण विभाग, जुने जाणते सदस्य श्री. वसंतराव गद्रे यांच्या पुढाकाराने चालू झाला. १४ डिसेंबर २०१९ या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत यावर रितसर शिक्कामोर्तब झाले.
सानपाडा स्टेशनमध्ये असलेल्या अरूप इलेक्टिकल इंजिनीअर्सने त्यांची जागा काहीकाळासाठी, कायदेशीर, ईलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या कामासाठी व कुठलेही हक्क निर्माण होणार नाहीत, या अटीवर वापरण्यासाठी परवानगी दिली. इकॅम कोकण सभासदांच्या पहिली सभा दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी, अरूप ईलेक्ट्रिकल इंजिनियर्स सानपाडा ऑफीस मध्ये झाली. सभेला खालील सदस्य उपस्थित होते. सर्वश्री वसंत गद्रे, अरविंद गद्रे, उल्हास बाजरे, विठ्ठल जव्हेरी व बी. एन. वाघ.
सभेत खालील पदाधिकारी सर्वानुमते ठरले. श्री. अरविंद गद्रे प्रभारी अध्यक्ष, श्री. विठ्ठल जव्हेरी उपाध्यक्ष, श्री. वसंतराव गद्रे कार्यवाह, श्री. बी. एन. वाघ खजिनदार श्री. उल्हास वजरे हे ईलेक्ट्रिकल सल्लागार म्हणून काम करत असल्याने, त्यांनी कौशल्य विकास व विद्युत सुरक्षा या विषयावर लक्ष्य केंद्रित करावे असा विचार झाला.
सभेमध्ये सभासदांना विद्युत सुरक्षा व कालांतराने येणारे केव्हिएएच बिलींग या विषयावर अधिक माहिती देऊन, भविष्य कालातील नव्या व्यापार विषयक संधिबाबत माहिती द्यावी असे ठरले. यासाठी विभागातील शहरात, विद्युत सुरक्षा व कालांतराने येणारे केव्हिएएच बिलींग या विषयावर परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन करावे हाही विचार ठरला.
पहिल्या सभेनंतर सर्वश्री अरविंद गद्रे, वसंतराव गद्रे व बी. एन. बाघ यांनी पेणला जाऊन, विद्युत निरिक्षक श्री. राजेंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन, विद्युत सुरक्षिततेविषयी काय करावे यावर त्यांचे विचार समजून घेतले व इकॅम कोकण विभाग करणार असलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व परिसंवादाला उपस्थित राहून संबोधित करण्याची विनंती केली.
पहिला परिसंवादाचे आयोजन विद्युत सुरक्षा या विषयावर वाशीयेथील नवी मुंबई स्पोर्टस् क्लब मध्ये दि. १७ फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आले. या विषयीची सर्व जबाबदारी मुख्यतः श्री. वसंतराव गद्रे, सेक्रेटरी यांनी उचलली व श्री. विठ्ठल जव्हेरी यांनी त्यांना साथ दिली. कार्यक्रमास सुमारे ५० सभासद व १० प्रायोजकांकडील व्यक्ती उपस्थित होत्या. इकॅम कोकण विभागातील सभासदांच्या या पहिल्याच कार्यक्रमाला पदाधिकारी इकॅमचे अध्यक्ष सर्वश्री सुनील भुरेव जनरल सेक्रेटरी श्री. मिलिंद नाईक, हे आवर्जून उपस्थित होते. पुणे व नाशिक येथील काही सदस्यही पाठिंबा देण्यासाठी आले होते.
आपल्या भाषणात सर्वश्री सुनील भुरे अध्यक्ष व मिलिंद नाईक, जनरल सेक्रेटरी, यांनी सभासदांना व कोअर कमिटी सदस्यांना प्रोत्साहीत करणारे विचार मांडले. विभागाला या दोघांकडून व पुणे, नाशिकच्या सदस्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा उत्साहित करणाऱ्या होत्या. आभार प्रदर्शनाच्या वेळी श्री. विठ्ठल जव्हेरी यांनी सर्वश्री सुनील भुरे अध्यक्ष ईकॅम व मिलिंद नाईक, जनरल सेक्रेटरी व इकॅमच्या पुणे व नाशिक येथील सदस्यांचे खास आभार मानले.
कार्यक्रमात सुरवातीला श्री. वसंतराव गद्रे यांनी इकॅम कोकण विभागाची गरज व स्थापना याविषयी विवेचन केले. नंतर श्री अरविंद गद्रे यांनी कत्राटदारांना नवीन संधी या विषयावर विचार मांडले. यानंतर श्री. उल्हास वजरे यांनी 'सीईए २०१०' यातील नियम व सुरक्षाविषयक तरतुदी याचा उहापोह केला. कोकण विभागासाठी असलेल्या पेण येथील विद्युत निरिक्षक श्री. राजेंद्र चव्हाण यांनी श्री. मेहतर, प्रशिक्षण अधिकारी व उपनिरीक्षक यांना परिसंवादाला संबंधित करण्यासाठी पाठविले होते. त्यांनी दिलेली माहिती ही सभासदांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची होती. यानंतर प्रायोजकांकडील माहिती व आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपला.
२४ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता, अरूप इलेक्टिकल इंजिनीयर्सच्या, सानपाडा कार्यालयात कोअर कमिटीची सभा झाली. या सभेत आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन खालील निर्णय घेण्यात आले. १. सर्वश्री अनिकेत भिसे व बालाजी घुमे यांना कोअर कमिटीवर घ्यावे.
२. श्री. अनिकेत भिसे हे सहकार्यवाह असतील.
३. श्री. विठ्ठल जव्हेरी यांनी श्री. वसंतराव गद्रे यांच्या बरोबर परिसंवादाचे खर्च व उत्पन्नाचे स्रोत यावर विचार करून, कोअर कमिटीला माहिती द्यावी. ४. सर्वश्री वसंतराव गद्रे व बी. एन. वाघ यांनी एमएसइडिसिएल व विद्युत निरिक्षक यांच्या कार्यालयात संपर्क वाढवावा.
५. पनवेल येथे KVH billing वर परिसंवादाचे आयोजन मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात करावे.
पनवलेला श्री. वसंतराव गद्रे यांनी ठरविलेला दिनांक २७ मार्च २०२० चा कार्यक्रम व श्री. अरविंद गद्रे यांनी ठरविलेले प्रायोजक करोनामुळे, अमर्याद कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. करोना मुळे फक्त फोनवर विचार विनिमय शक्य होत होता. ९ मे २०२० रोजी पहिली वेब सभा श्री. अनिकेत भिसे सहकार्यवाह यांनी आयोजित केली. सर्व कोअर कमिटी सदस्यांनी भाग घेतला.
१. श्री. अरविंद गद्रे, प्रभारी अध्यक्ष यांनी सदस्यांना, १ एप्रिल २०२० पासून लागू झालेल्या केव्हिएएच नियमांविषयी माहिती दिली. २. सर्व इकॅम सदस्यांसाठी वेबिनार करण्यात यावेत यावर विचार होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले.
सदस्यासह सुरक्षा कशी राबवताना येईल यावर प्रयत्न केले जातील. विद्युत निरीक्षकांबरोबर व्यापक चर्चा हे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. इकॅम कोकण विभागाचा दुसरा अहवाल १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सदर केला होता.
करोना साथीने पूर्ण देशाला ग्रासले होते. अर्थात आमचे ३. नवे सदस्य मिळविण्यासाठी काय प्रयत्न केले जावेत यावर सामुहिक चर्चासत्राचे सभागृहातील कार्यक्रम राबवणे अशक्यच चर्चा झाली.
४. वेबिनार विषयी माहिती गोळा केली जावी. यानंतरची वेब सभा २० जून २०२० रोजी झाली.
१. येत्या दोन महिन्यात करायच्या वेबिनार वर विचार झाला. तारखा सुचविण्यात आल्या.
व २. महाराष्ट्र शासनाच्या सेफ्टी दिवसा आधी कामोठे पनवेलमधील कांही शाळांमधून सर्व पनवेलमधील सुरक्षा, सर्व टर्मिनलची तपासणी, अर्थिंग तपासणी आदी काही बाबतीत काय करता येईल याचा विचार करण्यासाठी, सर्वश्री बाघ, खजिनदार व बालाजी घुमे यांना अधिकार देण्यात आले.
३. अशा कामांसाठी म्युनिसिपल कॉरपोरेशनकडून काही आर्थिक पाठबळ मिळू शकते कां? याची चाचपणी श्री. वसंतराव गद्रे यांनी करावी असे ठरले.
१. यानंतर पहिला वेबिनार इकॅम कोकण विभागातील सभासदांच्या तर्फे व इकॅम बिओडीच्या सहकार्याने केव्हिएएच बिलींग या विषयावर करण्यात आला. सिक्युअर मीटर्स या कंपनीकडून झाला. तारीख होती १२ जून २०२०.
२. दुसरा कार्यक्रम दिनांक ४ जुलै २०२० रोजी, कारगील कंपनीचा झाला. ट्रान्सफॉर्मर साठी उपलब्ध असलेल्या अधिक सक्षम त्याविषयी माहिती व उपयुक्तता यावर हा कार्यक्रम होता.
1 ३. दिनांक १७ जुलै २०२० रोजी मेगर कंपनीतर्फे बेसिक्स ऑफ अर्थिंग या विषयावर हा कार्यक्रम होता. कंत्राटदारांची गरज लक्षात ठेऊन विषयाची मांडणी करण्याविषयी चर्चा आयोजकांशी आधी केली होती. ४. दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पॉवरइझी कंपनी तर्फे 'स्मार्ट डिबीज' या विषयावर एक वेबिनार आयोजित करण्यात आला होता. घरातील व इतर ठिकाणी ह्या डिबीमुळे सुरक्षा कशी वाढेल यावर उपयुक्त माहिती मिळाली. प्रत्येक कोअर कमिटी सदस्यांनी इकॅम बिओडीच्या समित्यांवर काम करण्यात रस घ्यावा असे ठरले. त्यानुसार सर्व कोअर कमिटी सदस्य हे निरनिराळ्या समित्यांचे सभासद झाले आहेत. यानंतर ३१ मार्च २०२१, पर्यंत सुरक्षेविषयी कारखान्यांसाठी परिसंवादाचे आयोजन, नवी मुंबई व तळोजा येथील कारखान्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकारी व इतर होते. पण यावर उपलब्ध मार्ग वेबिनार्स होताचं. तरीसुद्धा जेव्हा जेव्हा सरकारने नियम शिथिल केले तेव्हा तेव्हा कार्यकारी मंडळाने दोन कार्यक्रम सभासदांसाठी सदर केले. पहिला होता, एका कारखान्याला भेट. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी, जेमिनी पॉवरहायड्रॉलिक पी. एल या कंपनीच्या कळंबोली येथीलं कारखान्याला भेट दिली. या कार्यक्रमास २५ सभासद उपस्थित होते. रस्त्यावरील दिवे तसेच कारखान्यामधील उंचावरील दिवे लावण्यासाठी व देखभालीसाठी यांच्या उत्पादनाचा उपयोग होतो. दुसरा कार्यक्रम पनवेल येथे झाला. HavellsMo पनवेल येथीलं वितरक आदित्य एटरप्रायजेस यांनी सभासदांसाठी तो आयोजीत केला होता. या दोन्ही कार्यक्रमांसाठी सर्वश्री. वसंत गद्रे, विठ्ठल जव्हेरी, बी. एन. बाघ व अनिकेत भिसे यांनी खूप परिश्रम घेतले.
श्री. उल्हास वजरे यांनी इकॅमच्या मासिकात वीज सुरक्षा यावर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला. सर्वश्री. उल्हास बजरे, अरविंद गद्रे व चिदंबर जोशी ( सल्लागार) यांनी बीज सुरक्षा या विषयावर चर्चा करण्यासाठी इलेक्ट्रीकॅल इन्स्पेक्टर, श्रीमती वाठोरे यांची भेट घेवून प्रदीर्घ चर्चा केली.
कोकण विभागाचे एक डायरेक्टर श्री. घुमे यांनी करोना काळात आलेल्या कोकणातील वादळग्रस्त गावात बीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी खूप चांगले काम केले.
पहिल्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ ३१ जानेवारी २०२२ पर्यंत होता. नवीन कार्यकारी मंडळाने १ फेब्रुवारी २०२२ रोजी कार्यभार स्वीकारला. नवी कार्यकारिणीवर खालील सभासदांनी कार्यभार स्वीकारला.
- १. श्री. उल्हास बजरे चेअरमन २. श्री. विठ्ठल जव्हेरी उप चेअरमन ३. श्री. वसंत गद्रे कार्यवाह ४. श्री. अनिकेत भिसे खजिनदार - सर्वश्री. बाळासाहेब बाघ, बालाजी घुमे व अरविंद गद्रे सभासद दोन विषयावरील भाषणे व चर्चा लवकरात लवकर करण्याचे ठरले.
यापैकी पहिला कार्यक्रम केव्हीएच Tariff या विषयावर पनवेल येथील रेडविंग कॅसल मध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी तसेच पुढल्या कार्यक्रमासाठी सभागृह लहान असल्याने व सभासदांचा प्रतिसाद चांगला असल्याने, अधिक मोठ्या सभागृहाची जाणीव संयोजकांना झाली. सभासदांना अशा कार्यक्रमात खूप रस असल्याने असे कार्यक्रम आयोजित करावे असे धोरण कार्यकारी मंडळाने ठरवले. पहिला कार्यक्रम अरूप इलेक्ट्रीकॅल इंगीनिअर्सचे श्री. अरविंद गद्रे, अभी गद्रे व गौरव गोसावी यांनी सादर केला.
दुसरा कार्यक्रम ८ एप्रिल २०२२ रोजी वरील सभागृहात ऍक्सिस इलेक्ट्रीकल्स कॉम्पोनंटने सदर केला. विषय इमारतींना कडाडणाऱ्या विजेपासून असलेला धोका व अर्थिंग.
यावर चर्चा होत राहिल्या. वीज सुरक्षा आणि सहनिवास यावर जागृती करावे असे ठरले. पण सहनिवास व सभासदांचा थंड प्रतिसाद यामुळे या कार्यक्रमास गती येत नाहीये. यावर विचार व उपाय यामध्ये कार्यकारी मंडळ इतर बार्बीना न्याय देउ शकत नाहीये. या कामांसाठी अपेक्षेपेक्षा खूप जास्त पैशाची गरज आहे.
या व्यतिरिक्त सभासदाना नवीन माहितीसाठी नवीन केबल्स होता, वायर्स, वीज व सोलर पंप, त्यांना लागणारे स्टार्टर्स, व वीज सुरक्षेचे नवीन सिइए २०२३ मधील महत्वाचे फेरफार याविषयी चर्चा सत्र करावीत असे धोरण आहे. हे विषय व असेच इतर विषय जे पूर्ण इकॅमला लागू पडू शकतील का? यावर मुख्य कार्यालयाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
कोकण विभागाची सर्वसाधारण सभा १९ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आली. माननीय कार्यवाह श्री. मिलिंद नाईक व कोषाध्यक्ष श्री. संजय कोल्हटकर आवर्जून उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केले. सभेला असलेला प्रतिसाद कमी होता. सभासद्दंचा प्रतिसाद वाढवण्यासाठी पुढील काही महिन्यात कार्यकारी मंडळाची क्षमता वाढवण्याचे ठरले.
जानेवारी २०२३ मध्ये श्री. रवींद्र पाटील व फेब्रुवारी २०२३मध्ये श्री. सुरेश पोटे यांची कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात आली. कालांतराने श्री. पोटे यांना सहकार्यवाह म्हणून नियुक्त केले गेले.
वेळोवेळी इकॅमच्या संवत्सरी निमित्त काय कार्यक्रम करावेत आताचे कार्यकारी मंडळ :
श्री. उल्हास वजरे अध्यक्ष, श्री. विठ्ठल जव्हेरी उपाध्यक्ष, श्री. वसंत गद्रे कार्यवाह, श्री. सुरेश पोटे सहकार्यवाह, श्री. अनिकेत भिसे खजिनदार, श्री. बाळासाहेब वाघ व श्री. रवींद्र पाटील सभासद. श्री. अरविंद गद्रे यांना वेळोवेळी माहितीसाठी निमंत्रित करण्यात येते.
उल्हास वजरे (चेअरमन कोकण विभाग. )

konkan

konkan REGIONAL EXECUTIVE COMMITTEE

Name Designation Company Name Mobile No.
Shri Ulhas Vajre Chairman Sumit Engineering Services 9821672242
Shri Vitthal Zaveri Vice-Chairman Prinz Engineers (India) 9819700609
Shri Vasant Gadre Secretary Gadre Electrical Works 9820449203
Shri Aniket Bhise Treasurer Bhise Infoelec Pvt. Ltd. 9323152909
Shri Arvind Gadre Past Chairman Aroop Electrical Engineers Pvt. Ltd. 9869679429
Shri Balaji Ghume Member Shri Balaji Electricals 9869369141
Shri Balasaheb Wagh Member Pan Enterprises 9820666233
Shri Suresh Pote Member Sip Enterprises 9322401965
ROLE OF HONOUR

CHAIRMAN

Sr. No. Name Years Profile
1 Shri Madhav Gadre 2020-2022
2 Shri Ulhas Vajre 2023 TO Till date

HONORARY SECRETARY

Sr. No. Name Years Profile
1 Shri Vasant Gadre 2020 To Till date
GALLERY

Our GALLERY

Go To Top