E C A M I N D I A

Regions

इकॅम नाशिक विभागाचा इतिहासहास

मित्रांनो एक काळ असा होता जेव्हा वीज निर्मिती आजच्या सारखी होत नव्हती. सगळी कामं हातांनी अर्थात पारंपारिक पद्धतीनेच चालत असत. जिथे मानवाच्या शक्तीला मर्यादा आहेत तिथे पशूंच्या ताकदीचा वापर होत होता. पुढे बीज निर्मिती' करता येऊ लागली आणि आपल्या आयुष्यातला अंध:कार दूर झाला. घरं, कार्यालयं, मंदिरं येवढंच काय अगदी रस्त्यांवर सुद्धा विजेच्या दिव्यांच्या रांगा रात्रभर आपल्या दिमतीला जळत उभ्या राहू लागल्या. अंधार नगरी आता दिव्यांची नगरी झाली..! जसे मानवाचे आयुष्य उजळत गेले तसाच आणखी काही गोष्टींवर प्रकाश टाकावा म्हणून हा लेखन प्रपंच.... दिव्यांच्या नगरीसाठी वीज निर्मिती केंद्र उभारून तिथ पासून ती कित्येक मैल दूर वाहून नेण्याची व वितरीत करण्याची भली मोठी यंत्रणा उभी राहिली. यात प्रामुख्याने प्रशिक्षित तारतंत्रीं वायरमन पासून ते इंजिनियर्स पर्यन्त सर्व मंडळी सुरक्षित आणि सुलभतेने सोय करून देण्यासाठी तत्पर झाली. वीज नामक ऊर्जा आता व्यक्तीगत, व्यावसायिक व औद्योगिक सर्वच क्षेत्रात अत्यावश्यक होऊन बसली. पुढे हा व्यवसाय जसा फोफावत गेला तशी यांची ओळख वायरींगचे काम करून देणारे लोक' अशी मर्यादित स्वरूपाची न राहता एक नवीन फळी उभी राहिली कंत्राटदारांची...!
पण या कंत्राटदारांना १०० वर्षांपूर्वी सुद्धा अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी संघटित होत एक संस्था स्थापन केली.इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात इकॅम १९२५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचं पहिले नाव होते दि असोसिएशन ऑफ वायरिंग काँट्रॅक्टर्स नंतर अन्य शहरात सुद्धा उद्योग वाढ होऊ लागली तशी संस्था केवळ मुंबई पुरती मर्यादीत न राहता राज्यस्तरीय झाली. १९७२ साली संस्थेचे नाव इलेक्ट्रिकल कॉंट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र झाले. या इकॅमचे शतकपूर्ती वर्ष साजरे होणार आहे हीच संस्थेच्या यशाची सगळ्यात मोठी पावती आहे. १०० वर्ष अविरतपणे कार्यरत राहणं ही गोष्ट आता केवळ कार्यालयीन भाग म्हणून राहिलेली नाही तर हा एक अतुलनीय आदर्श बनला आहे. कर्तृत्वाचे एक उत्तुंग शिखर बनलं आहे. या मागे अनेकांची मेहनत, अनुभव, समर्पण भाव, सर्वंकष उत्कर्ष साधण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कोणत्याही समस्येला भेदून पुढे जाण्याची जिद्द आहे. म्हणूनच ही संस्था एवढा मोठा १०० वर्षांचा पल्ला गाठू शकली. या संस्थेचे दुसरे विभागीय केंद्र नाशिक नगरीत १९८९ साली स्थापन झाली. आधीची मंत्रभूमी असलेली ही नाशिक नगरी आता यंत्रभूमी बनली होती. तेव्हा नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर या चारही शहरांचा
मिळून एक विभाग करून या विभागा अंतर्गत त्यांचा कारभार चालत असे. नाशिक विभागाने या चारही शहरा मधील कंत्राटदारां करता केलेले उल्लेखनीय कार्य व उपक्रमांचा हा थोडक्यात लेखाजोखा.... सर्व प्रथम अशा संस्थेची गरज का निर्माण झाली असेल ते पाहुयात. या प्रश्नाचं उत्तर शोधतांना लक्षात येतं की नाशिक येथे आणि अन्य शहरातही विद्युत ठेकेदारांना छोटी वा मोठी कामे करत असतांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागत होते. संस्था स्थापन होण्या आधीची कंत्राटदारांची परिस्थिति फारच बिकट होती अस म्हटल्यास वावगे ठरू नये. समजा एखाद्या कंत्राटदाराला काही समस्या निर्माण झाल्याच तर तो दाद मागायला जाणार कोणाकडे? तर त्यांच्याच कडे जे काम देत आहेत. बिलं मंजूर करणार आहेत. त्यांना गोष्टी पटल्या तर ठीक अन्यथा नुकसान होणार हे निश्चित. मग नुकसान टाळण्यासाठी तो बापडा आपल्याच एखाद्या व्यावसायिक बंधुकडे जाऊन काही मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करणार. या चक्रात आपली व्यावसायिक गणितं दुसन्या समोर उघड करणे म्हणजे अवघड जागेचं दुखणं. बरं ते तरी किती मदत करतील ? त्याला निश्चितच मर्यादा आहेत. म्हंटल्यावर दाद मागायची कुठे अन कशी ? बरं उठसूट कोर्टात धावणंही अशक्यच; म्हणजे नुकसान हे अटळ..! या व्यतिरिक्त व्यवसाय म्हंटल्यावर स्पर्धा, काम पदरात पाडून घेण्यासाठी दर कमी करणे, अधिकृत अनधिकृत कंत्राटदार, ठेकेदार अशा अनेक समस्या होत्याच. या सगळ्या अडचणी एखाद दुसन्याला नाही तर सर्वांनाच भेडसावत होत्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे काही करावे अशी गरज निर्माण झाली होती. तेव्हा काही कंत्राटदारांनी पुढाकार घेतला. अनेक कंत्राटदारांना बरोबर भेटीगाठी घेतल्या. सगळ्यांना एका छता खाली आणण्याच्या घाट घातला. या प्रयत्नाला यश लाभले ते दिनांक १३ मार्च १९८९ या दिवशी रामदेव' या ठिकाणी पहिली मिटींग घेऊन याचा कार्यारंभ झाला. या मीटिंगमध्ये सर्वप्रथम ९ सभासदांची एक कार्यकारणी स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. ज्या मध्ये श्री. जयसिंह अलाधिया नाशिक शाखेचे प्रथम अध्यक्ष म्हणून तर श्री. अ. रा. खांबेकर सचिव म्हणून नियुक्त झाले. त्या नंतर शनिवार दि. २९ एप्रिल १९८९ रोजी नाशिकच्या सूर्या हॉटेल मध्ये एक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ज्या मध्ये मुंबई इकॅम चे पालकत्व महासंचालकांच्या अधिपत्यात इकॅमचे तेंव्हाचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. पी. डी. नाडकर्णी, नाशिक विभागाच्या अंतर्गत असलेल्या चारही शहरातले सभासद व महाराष्ट्र राज्य विज मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. तसेच अध्यक्षांच्या मार्गदर्शना नुसार कार्यकारणी व शाखेच्या कामाचे स्वरूप आणि रूपरेखा जाहीर करण्यात आली. जेणे करून उपस्थितांना या विषयाची स्पष्टता यावी की संस्थे मार्फत प्रत्येक सभासदाला कोणकोणत्या पातळीवर मदत होणार आहे. सभासद म्हणून आपला व्यवसाय करणे कसे सुलभ होणार आहे. हिरीरीने कामाला लागलेल्या या शाखेने पाहिल्याच वर्षात दर महिन्याला एक अशा एकूण १० सभा घेतल्या. या सभांमधून कंत्राटदारांना एकत्र करून मार्गदर्शन करणे, संस्थेच्या कामा विषयी माहिती देणे, त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी मदत करणे, व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी कराव्यात वा करू नयेत या संदर्भातले नियम समजावून सांगणे, कायद्याच्या पातळीवरचे प्रश्न सोडवणे अशा हर एक अडचणीवर तोडगा काढायचा भगीरथ प्रयत्न सुरू केला. धुळे आणि नगरला सुद्धा एक सभा घेण्यात आली. त्यांच्या कडूनही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रत्येक सभेत नवनवीन मुद्यांवर चर्चा व आधीच्या मुद्यांचा आढावा घेत हे कार्य अधिक व्यापक बनवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान दिले गेले.
संस्थेकडून प्रथमत: ज्या मुद्द्यांना हात घातला त्यात परवाना नसलेल्या मंडळींच्या तक्रारी समितीकडे आल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद व तयारी संस्थेची होती. कारण बहुतेक वेळा पैसे वाचवण्याच्या उद्देशाने काम अशा लोकांच्या हाती सोपवण्यात येते ज्यांना त्याचे योग्य ते ज्ञान नसते. आवश्यक अनुभव, योग्य प्रशिक्षण वा महत्वाचे म्हणजे परवाना नसलेल्यांच्या हाती विजेचे काम देणे हे त्या वेळे पुरता जरी फायदेशीर वाटत असले तरी भविष्यात धोकादायक ठरू शकते. म्हणून तेव्हाचे चडएइ चे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर श्री. नझाम साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या कडून नाशिकच्या सर्व बिल्डर्स व आर्किटेक्ट्सची यादी मागवण्यात आली. श्री नझाम साहेबांनी या विषयाची अतिशय गांभीर्याने दाखल घेत दैनिक गावकरी या वृत्तपत्रात निवेदन जाहीर केले. त्याचे शीर्षक होते इलेक्ट्रिकल काम व त्याची काळजी..!
याचा परिणाम असा झाला की अनेक सरकारी, निमसरकारी तसेच औद्योगिक वा संस्थात्मक प्रकल्पांची कामे ही फक्त परवानाधारक कंत्राटदारांनाच देण्यात यावीत यावर शिक्का मोर्तब झाले. अर्थात काम मिळवणे एवढा एकच उद्देश या मागे नव्हता तर कंत्राटदारांच्या आणखीही काही मागण्या होत्या. त्या मागण्यांची म. रा. वि. मं. कडून दखल घेतली गेली. अशा रीतीने संस्थेच्या माध्यमातून अनेक मुद्दे, प्रश्न यांची उत्तरं मिळू लागली ती ही एकत्रीतपणे. नाशिक शाखा कार्यकारणीच्या सजगतेने काम करण्याचा लाभ सगळ्यानाच मिळू लागला. त्यामुळे आपल्या प्रश्नांचे निराकरण इथे होणार असा सार्थ विश्वास प्रत्येकाच्या मनात जागृत झाला. ज्या प्रश्नांचे समाधान झाले नसेल त्या संदर्भात आता पत्रव्यवहार होऊ लागला तो ही संस्थेच्या नावावर कमीतकमी कागदपत्रांची पूर्तता करून अनावश्यक बाबींना वगळत सुलभतेने कंत्राटदार परवाना नुतनीकरण सारखे अनेक विषय नाशिक विभाग उत्तमरीत्या हाताळत होते. ज्या मुळे ठेकेदार, कंत्राटदार, कामगारांना दिलासा मिळाला की आपण आता एकटे नसून आपल्या पाठीशी इकॅम चे भक्कम पाठबळ आहे. अशा अनेक आघाड्यांवर सातत्याने चालत असलेल्या भरीव कार्याची दखल इकॅम मुख्य कार्यालयाने सुद्धा घेतली आणि तसे प्रशंसापत्र' सुद्धा पाठवले. याचा सकारात्मक परिणाम जसा सभासदांचा विश्वास वाढवत होता तसा संस्था म्हणून आपण प्रत्येक समस्येला उत्तरं शोधू शकतो हा आत्मविश्वास इथल्या कार्यकारणीचा दृढावत चालला होता. याहून अधिक चांगली गोष्ट म्हणजे नाशिक विभागाचा ही विस्तार होत होता. शाखेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या चारही शहरां मधून सभासदांची संख्या वाढतच चालली होती. या वाढत्या परिघाचा केंद्रबिंदू म्हणजे शाखेचे स्वतःचे कार्यालय असावे अशी आता गरज निर्माण झाली होती.
याचीही गोष्ट रंजकच आहे. त्यावेळी संस्थेकडे १६०००रु. जमा होते. बाकी सभासदांना आवाहन करण्यात आले की आपल्या स्वहक्काच्या जागे करता आर्थिक योगदान करावे. सगळ्यांना सोयीचे पडेल अशा नाशिकच्या मध्यवर्ती भागात म्हणजे बावरे लेनमध्ये तलवारे चेंबर्सच्या दुसऱ्या मजल्यावर शाखेने कार्यालय घेतले. ज्यासाठी १,३२,०००रु बिल्डरला दिले गेले. त्या पैकी ८०,००० रु. इकॅम मुंबई कार्यालया कडून मिळविले होते. उर्वरित निधी सभासदांकडून मिळवण्यात आला. अनेकांनी सढळ हस्ते देणग्या दिल्याने शाखेकडे चांगला निधी उपलब्ध झाला तो फंड रेझिंग कमिटीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळेच. १९८९ साली सुरू झालेल्या शाखेने स्वमालकीचे कार्यालय थाटण्या इतकी मजल मारली फक्त ३ वर्षात. त्यामागे दूरदृष्टी, सातत्य, स्वतः चे काम घर कुटुंब याच्या बरोबरीने प्राधान्य देत सर्वोपकारक कार्यांचा ध्यास होता म्हणूनच हे साध्य झाले. एखाद्या संस्थेला १०० वर्ष पूर्ण होतात ती त्या संस्थेसाठी, सभासदांसाठी सर्वार्थाने स्वतःला झोकून देणारे लोक असतात म्हणूनच....
दि. ९ जाने. १९९४ रोजी नाशिकच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. हा उद्घाटन सोहळा श्री व्ही. एस. तामसे साहेब, चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या शुभहस्ते अगदी थाटामाटात पार पडला. या प्रसंगी मुंबईहून सुप्रिटेंडेंट इंजिनियर श्री. नझम साहेब, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर श्री पेंडसे साहेब आणि इकॅम मुंबईचे अध्यक्ष श्री नाडकर्णी साहेब यांची खास उपस्थिती होती. ऑफिस अतिशय उत्तम रीतीने सजवलं होतं. त्यात रिजनच्या बहुसंख्य सभासदांनी हजेरी लावल्याने सोहळा इतका दिमाखदार झाला की या सोहळ्याची मुंबई मुख्यालयाने सुद्धा भरभरून वाखाणणी केली. त्या वेळी नाशिक शाखेचे चेअरमन श्री नानासाहेब अहिरराव होते तर सचिव पदी श्री श्यामराव काण्णाव कार्यभाग सांभाळत होते. कामाचा पसारा आता इतका वाढत चालला होता की अहमदनगरच्या सभासदांनी मुंबई कार्यालयाकडे मागणी करून त्यांचे उपकार्यालय स्थापन केले. या मान्यताप्राप्त उपकार्यालयाच्या उपक्रमांना आपल्या कडून मनःपूर्वक शुभेच्छांसह त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभाग सुद्धा ओघाने आलाच. नाशिक शाखेला मुंबई कार्यालयातून सतत मार्गदर्शन आणि मदत मिळतच राहिली आहे पण अनेकदा पुण्याच्या शाखेने सुद्धा काही बहुमोलाचे सहकार्य केलेले आहे. लक्षात घेण्याचा मुद्दा असा की इथे विभाग कुठला असो हा प्रश्न गौण आणि प्रश्नाचं निराकरण याला प्राधान्य हीच संस्थेची भूमिका राहिलेली आहे.
आता कार्यालय थाटले म्हणजे तिथेच बसून राज्यकारभार चालवावा हा त्या मागचा उद्देश नव्हताच. उलट नवनवीन कार्यक्रम हाती घेऊन ते तडीस नेण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. एरवी सगळे सभासद उठून एखाद्या प्रकल्पाला आपणहून भेट देतील असे होतच नाही ना तशी संधी मिळत असते. या कामी विभागाने पुढाकार घेऊन वैतरणा पॉवर हाऊसला टेक्निकल टुर' आयोजित केली. जेणे करून सभासदांना त्या प्रकल्पावर चालणाऱ्या कामाचा अभ्यास करून त्याचा आपल्या कामात लाभ करून घेता यावा. इलेक्ट्रिकल व्यवसायात नवनवीन उत्पादनं बाजारात येत असतात. त्यांची माहिती आपल्या सभासदांना व्हावी व शक्य झाल्यास काही सवलतीचे दर निश्चित करावेत या उद्देशाने संस्थे कडून परिसंवाद आयोजित करण्यात आले. एरवी एखादा कंत्राटदार व्यक्तीगत पातळीवर कंपनीला अथवा त्यांच्या वितरकांना भेटला असता त्याला जितके लाभ मिळाले नसते तेच आता संस्था म्हणून मिळणे शक्य झाले. सवलत अर्थात खर्च होणारा पैसा वाचवणे वा जादा रक्कम न भरावी लागणे. जसे नाशिकच्या सभासदांची अडचणीची गोष्ट म्हणजे संस्थेची वर्गणी मुंबईला पाठवतांना बँक कमिशनचा प्रश्न येत होता तेव्हा नाशिकलाच बँक ऑफ इंडिया मध्ये त्याची सोय करून दिली. थोडक्यात कंत्राटदारांची ठेकेदारांची वणवण थांबावी म्हणून त्यांच्या वतीने संस्था धावत होती.
संस्थेची अशी घोडदौड चालू असतांना नियमा नुसार पहिल्या कार्यकारणीचा कार्यकाल संपुष्टात येऊन नवीन कार्यकारणी नियुक्त करणे हे क्रमप्राप्त होते. त्या नुसार वर्ष १९९३ ते ९६ या कालावधीत कार्यकारणीमध्ये स्वेछेने काम करण्यासाठी सभासदां कडून अर्ज मागवण्यात आले. नियमानुसार निवडणूकही घेण्याचे निश्चित केले पण आलेल्या अर्ज संख्ये नुसार सदस्यांची झालेली बिनविरोध निवड ही खरोखर अभिनंदनीय गोष्ट ठरली. लगोलग मेंबरशिप कमिटी, लिगल कमिटी, स्मरणिका कमिटी अशा समित्या स्थापन करून त्याच्या जबाबदऱ्यांचा वाटप केला गेला. त्यासाठी समन्वयकही नेमले गेले. शाखेचा वाढता पसारा आणि त्याचा लेखाजोखा ठेवण्यासाठी लिपिकाची नियुक्ती करण्यात आली. जेणे करून एखाद्या सभासदास काही मदत हवी असेल अथवा काही पूर्तता करवायची असेल तरी संस्थेची मीटिंग होई पर्यंत वाट बघायची गरज राहणार नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की इथले पदाधिकार्यांची खुर्ची अडवण्याची भूमिका नसून इतरांनीही या संस्थेचा कारभार सांभाळण्यासाठी पुढे यावे आणि बाकीच्यांनी त्यांना सहाय्य करावे असा आदर्श उभा केला. जरी तुम्ही पदाधिकारी नसलात तरी समिती म्हणून जबाबदारी घेत आपलेपणाने संस्थेचा कारभार चालवावा. संस्थेचे कार्य अधिक व्यापक बनवत त्याच्या सर्व कंत्राटदारांना ठेकेदारांना लाभ मिळवा यासाठी सगळे जण झटत होते. या पलीकडे नाशिक विभागाचे पदाधिकारी शक्यतो दर महिन्याला मुंबईला होणाऱ्या मिटिंग्सला जात होते. आपले मुद्दे त्यांच्या समोर मांडत होते. त्यावर त्यांचे कायदेशीर मार्गदर्शन मिळवणे, आपल्या गोष्टींचे निराकरण करणे हे जसे चालू होते तसेच इतर विभागाचे उपक्रम काय चालतात ? त्याचा अवलंब आपण करू शकतो का? या हेतुने प्रयत्नशील होते. थोडक्यात नाशिक विभाग आपल्या सभासदांना सर्वतोपरी उपकारक ठरतील अशा प्रत्येक गोष्टींसाठी कटिबद्ध राहून इकॅम संस्थेचा मूळ उद्दीष्ट साध्य करत होती...!
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सच्या व्यवसायात काय अन कुठून अडचणी येत असतात याची बाहेरच्यांना पुसटशीही कल्पना नसते. साध्या साध्या गोष्टी म्हणजे एमएसईबी पूर्वी कंत्राटदाराचे नाव आणि परवाना नंबर नमूद ए-१ फॉर्मवर करत नसे ती पद्धत संस्थेमुळे सुरू झाली. पीडब्ल्यूडी कडून विद्युत संच मांडणी करतांना बॅटन ऐवजी पीव्हीसी पाइप किंवा सिडको इलेक्ट्रिकलची कामे सुद्धा सिव्हील कॉन्ट्रॅक्टर्सला देत होते या सारख्या गोष्टीत संस्थेने हस्तक्षेप करावा. अशा अनेक अपेक्षांची इकॅमकडे रिघ लागली कारण ही प्रकरणं एकट्या दुकट्याच्याने तडीस नेणे अशक्य असल्याने संस्थे मार्फतच यावर योग्य तो मार्ग काढला जाईल ही गोष्टीची सगळ्यांना खात्री पटली होती. या मुद्द्यावर चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुंबई पासून ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पर्यन्त सगळ्यांशी संस्थेने पत्रव्यवहार केला. इकॅमचे अध्यक्ष श्री. अब्राहम ह्यांच्या बरोबर एमएसईबी च्या बांद्रा येथील कार्यालयात चर्चा आयोजित केली आणि त्याचे तपशील इथल्या सभासदां पर्यन्त पोहोचवले. येवढंच काय तर एमएसईबी च्या डायरेक्टर बॉडीवर इकॅमचा एक सदस्य असावा यासाठीही पाठपुरावा केला गेला. या झाल्या मोठ्या पातळी वरच्या गोष्टी. या व्यतिरिक्त डीएसआर रेट वाढवून घेणे, बिलात अयोग्य रक्कम आली तर संस्थेने त्याचा पाठपुरावा करून योग्य ती रक्कम मिळवून देणे या सारख्या ठेकेदारांच्या व्यक्तीगत समस्या सुद्धा सोडवल्या. १९९१ साला पर्यन्त केलेल्या पैकी या काही गोष्टी. तेव्हा श्री. जयसिंह अलाधिया नाशिक विभागाचे प्रथम चेअरमनपदी होते तर सचिव म्हणून श्री शामराव काण्णव कार्यरत होते. इतर सर्व पदाधिकारी समित्यावर नियुक्त मंडळी आणि सभासद यांच्या प्रतिसादाने शाखेचे कार्य जोमाने पुढे जात होते. सभांचे आयोजन हा तर संस्थेसाठी नित्यक्रमच झाला होता. केवळ नाशिक पुरताच या सभा मर्यादित नसून धुळे, जळगाव सारख्या ठिकाणी सुद्धा तिथल्या लोकां पर्यन्त आपल्या कार्याचा कसा लाभ पोहोचवता येईल या साठीही नाशिक विभाग कायम प्रयत्नशील असे. जळगावच्या लोकांनी नाशिक रिजनशी सतत संपर्क ठेवल्याने व्यक्तीगत अडचणींचे निराकरण होते याची इतरांना खात्री पटवून दिली. या सभेसाठी जळगावच्या संचालकांनी विशेष सहकार्य करत असोसिएशनची आवश्यकता आणि फायदे उपस्थितांना लक्षात आणून दिले. अनेक शंकाकुशंकांचे निरसन या ठिकाणी झाल्याने आणखी सभासद जोडले गेले. तशीच एक सभा श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली होती जिथे व्यासपीठावर Don't monkey with Electrical fittings. Call licensed Electrical Contractor's, म्हणजे इलेक्ट्रिकलच्या कामाशी माकडचाळे करू नका तर परवानाधारक कंत्राटदारा कडूनच काम करवून घ्या असा संदेश असलेला कापडी बॅनर झळकवण्यात आला होता. उपस्थितांनी विद्युत संबंधित कामाची गंभीरतेने दाखल घ्यावी हा त्या मागचा उद्देश होता. मुंबईत मोठमोठाली औद्योगिक प्रदर्शनं भरत असतात. तिथे गेल्याने आपल्या व्यवसाय बंधूंना चांगला फायदा होतो. नवनवीन उत्पादने, सिस्टिम्स यांची माहिती मिळते. त्यांचे संपर्क मिळतात. आपल्या कामात त्या उत्पादनांचा कसा उपयोग करून घेता येईल याची प्रत्यक्ष चर्चा करता येते. अशा अनेक बाबतीत हा उपक्रम फायद्याचा असला तरी नाशिक मधुन खास तेवढ्या करता आपले व्यवसाय सोडून कोण आणि कितीजण जाणार? संस्थेने आपल्या नाशिक शाखेच्या सभासदांना वेळोवेळी उद्युक्त करून तिथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
सदोदित वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्याचा ध्यास घेतला असतांना चालू कामाच्या रामरगाडयात काही वेगळे करावे अशी कल्पना सुखावून जाणारी असतेच. मग त्या करता अधिकचे कष्ट घ्यावे लागले तरी हरकत नसते. अशीच एक सुखद कल्पना समोर आली की ज्यांना हा व्यवसाय करता करता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा एकत्रित सत्कार सोहळा आयोजित करावा. खरंतर तांत्रिक काम म्हणजे अत्यंत रुक्ष नीरस प्रकारचं मानलं जातं पण असे सारखे उपक्रम जिव्हाळा उत्पन्न करणारा ठरेल. त्याहून अधिक म्हणजे आधीच्या पिढीला यामुळे आपल्या केलेल्या कामा बद्दलची कृतज्ञता सुखावून जाईल तर पुढच्या पिढीला त्यांचे विचार अनुभव प्रेरणादायी ठरतील इतका महत्वपूर्ण या उपक्रमासाठी विभागाचे खरोखर करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
या कौतुकांच्या पलिकडची दुनिया जिथे आपण प्रत्यक्ष काम करतो आणि आपला चरितार्थ चालवतो ती वेगळीच असते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे पीडब्ल्यूडी कडे लाकडी बॅटन ऐवजी पीव्हीसी पाईप वापरणे बाबत जो प्रस्ताव पाठवला होता. त्याला मर्यादित स्वरूपाची मान्यता मिळाली ते वर्ष उजाडले १९९७. या वरून लक्षात येईल की संस्था म्हणून एखाद्या गोष्टी साठी किती काळ पाठपुरावा करत राहावा लागतो.
सरकारी कारभार म्हंटल्यावर अचानक काय फर्मान निघेल याचा काय भरवसा ? प्रादेशिक विद्युत मंडळ औरंगाबाद इथले आधीक्षक अभियंता यांचे कडून या पूर्वी नूतनीकरण झालेले परवाने पोस्टाने सर्व ठेकेदारांना प्राप्त होत असत. ती प्रथा अचानक बंद करून ठेकेदाराने या पुढे स्वतः येऊन अथवा त्यांच्या प्रतीनिधीस पाठवून परवाना घेऊन जाण्याचे कळविण्यात आले. जे अर्थातच सर्वांसाठी अडचणीचे ठरणार होते. मग त्यावर संस्थेने पत्रव्यवहार करून या संदर्भातली सगळ्यांची मागणी त्यांना कळवली. एकीकडे डीएसआर रेट वाढवून मिळावेत, परवाना रद्द होण्याच्या घडत असलेल्या प्रकारांना पायबंद घालावे अशा स्वरुपात काम चालू असतांना दुसरीकडे आपल्याच सभासदांना वारंवार हे ही सांगावे लागत होते की त्यांनी उदासीन न राहता आपल्या ज्या समस्या निर्माण झाल्या असतील त्यांचे कागदोपत्री पुरावे संस्थेकडे सुपूर्त करावेत म्हणजे संस्था त्यावर योग्य ती कारवाई करू शकेल. केवढा तो खटाटोप... पण हे खटाटोप ज्यांच्या अंगवळणी पडतात त्यांना असलेल्या जबाबदऱ्यांचा भार काहीच वाटत नाही. मग ते आणखी काहीतरी अचाट अफाट करण्याचा घाट घालतात. आता १९९७ भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाली ते सुवर्ण महोत्सवी वर्ष..!' याचे औचित्य साधायचं म्हणजे तसेच काहीतरी जोरदार आयोजन करायचं नाशिक विभागाने मनावर घेतलं. २५ ते २८ डिसेंबर १९९७ या दिवसात ECAM द ९७ हे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे भव्य प्रदर्शन नाशिकला गोल्फ क्लब मैदान, त्र्यंबकरोड येथे आयोजित केलं. पूर्वी कधीही झालं नसेल इतके भव्य प्रदर्शन नाशिक विभागाने या सुवर्ण महोत्सवी वर्षात भरवून भारताच्या स्वातंत्र्याला आणि भारताच्या तांत्रिक प्रगतीला अभूतपूर्व मानवंदनाच दिली. थोडेथोडके नाही तर ६० स्टॉल्स या प्रदर्शनात होते १९९७ साली तेही नाशिक सारख्या ठिकाणी. त्यावेळी महाराष्ट्र भरातून विविध कंपन्या, वितरक यांनी भरघोस प्रतिसाद देत या प्रदर्शनाला एक वेगळीच ऊंची प्राप्त करवून दिली. एशियन इलेक्ट्रॉनिक्स, फिनोलेक्स, फिलिप्स, किर्लोस्कर, आयईसीटी यां सारख्या अनेक नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स असल्यावर प्रदर्शनाचा डंका जोरदार वाजणार यात शंकाच नाही. त्या वेळी अध्यक्ष श्यामराव काण्णव आणि सचिवपदी श्री सुनील भुरे साहेब होते. सर्व संचालक मंडळानी, सभासदांनी झपाटल्यागत मेहनत करून हा प्रचंड डोलारा उभा केला होता. अशा या भव्य नी दिव्य प्रदर्शनाचे उद्घाटन मरा विमं चे मुख्य अभियंता श्री ग. रा. हेगडे यांच्या शुभहस्ते पार पडले. इंडस्ट्रियल पासून घरगुती उपकरणांची रेलचेल असलेल्या या प्रदर्शनाला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला. नामवंत आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, इंजिनियर्स, इंडस्ट्रियल, व्यावसायिकां पासून ते सर्वसामान्य नागरिकां पर्यंत सगळ्यांनी प्रतिसाद तर दिलाच वर समाधानही व्यक्त केले. या प्रदर्शनाचा उद्देश फक्त खरेदी विक्री येवढाच नव्हता तर जनजागृती वर सुद्धा या निमित्ताने भर देण्यात आला होता. विद्युत मंडळ व ग्राहक' तसेच इलेक्ट्रिसिटी व सेफ्टी अशा विषयांवर परिसंवाद या प्रदर्शनात आयोजित करण्यात आले होतेच पण विजेची बचत काळाची गरज' या विषयावर अत्यंत अनोखा असा औद्योगिक कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा यात ठेवण्यात आला होता. कीर्तनकार होते श्री संदीप भानवसे या प्रदर्शनाच्या यशाची पावती म्हणजे शुभेच्छांसह प्रतिक्रिया आणि अभिप्रायांचा वर्षाव झाला. सहभागी स्टॉल धारकांनी असे प्रदर्शन पुनः पुन्हा आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा या विभागाचे तोंडभरून कौतुक करत बोलून दाखवली. याच्या सांगता समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीबी कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. बक्षी साहेब व गॅब्रियल कंपनीचे जनरल श्री. पै. साहेब अध्यक्षपदी होते. त्यांच्या हस्ते ३ सर्वोत्कृष्ठ स्टॉलला पारितोषिके प्रदान करण्यात आली. एका अर्थी ही भारताच्या स्वातंत्र्याची दशकं पाच आणि प्रदर्शनतले स्टॉल्स ६० म्हणजे ही पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.....
या नंतर नाशिक विभागासाठी खरोखर आनंदाची गोष्ट म्हणजे या शाखेचा रौप्य महोत्सव...! १९८९ ला स्थापन झालेल्या या शाखेला कार्यरत होऊन २५ वर्ष पूर्ण झाली सुद्धा ही गोष्ट सत्य असूनही आश्चर्य चकित करत होती. म्हणजे इतरां करता कार्य करण्यात येवढे गढून गेलेले लोक आपल्याच वाटचालीच्या २५ वर्षांच्या इतिहासाला चकित होऊन पाहत होती. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर सुशील भुरें सारखे लोक जे तेव्हा कॉलेज मध्ये शिकत असलेले विद्यार्थी शाखेच्या संस्थेचे तेव्हा पासूनचे धडाडीच्या सगळ्याच कार्यकत्यांना २५ वर्ष उलटली आहेत यावर कसा विश्वास ठेवावा असेच झाले. आणि मागे वळून बघतांना दिसू लागतो आजवर आपणच दखल न घेता केलेला आपला कार्य प्रवास. सगळ्यांनी हा भगीरथ प्रयत्न येवढ्या सातत्याने चालू ठेवलाय हा विचार करता भरून पवायला होतं. या वेळची वार्षिक सर्व साधारण सभा विशेष होती म्हणून संस्थेचेच सदस्य अनिरुद्ध कुर्तडीकर जे प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत त्यांची खास गाणी सर्वांच्या आवडीची हा कार्यक्रम नाशिकच्या महाकवी कालिदास कलमंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्या रौप्य महोत्सवी वर्षात अध्यक्षस्थानी होते. श्री देवांग ठाकुर आणि सचिव पदी होते श्री रावसाहेब रकिबे या संचालक मंडळाने कामाचा असा धडाका लावला की इकॅमच्या इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक घटना नोंदवली गेली. ती म्हणजे एकाच वेळी १२३ नवीन मेंबर्स जोडले गेले. नगर, खांदेश रिजन वेगळा झाल्या नंतर जी संख्या घटली होती ती अशा रीतीने भरून निघाली. जणू नाशिक शाखेने संस्थेचे ऋण फेडत इकॅम ला रौप्य महोत्सवी वर्षातली दिमाखदार भेट दिली १२३ सभासदांच्या रूपात. आपण चांगल्या हेतूने कार्य करत असल्यास आपल्याला मिळणारे परिणामही चांगलेच असतात. याच वर्षात इकॅम आणि फेकॅम संयुक्त ने शासनाच्या एकत्रित निविदांच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली होती त्याचाही निकाल संस्थेच्या बाजूने लागल्याने हे रौप्य महोत्सवी वर्ष सर्वार्थाने लाभदायकच ठरले.....
असा प्रयत्न दर वेळेस विभागा कडून करण्यात येत होता. त्याचा फायदा सभासदांना होत होता तसा त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होत होता. हे नाशिक पुरताच मर्यादित स्वरूपाचं नव्हतं तर या विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या जळगाव धुळे इथेही हा व्यवसाय फोफावू लागला होता. त्या सगळ्यांचा स्वतंत्र कारभार चालावा अशी गरज निर्माण झाल्याने २०११ नंतर धुळे, जळगाव आणि नंदुरबार यांचा नाशिकच्या विभागीय अखत्यारीतून वेगळा करून स्वतंत्र खांदेश रिजन बनवण्यात आला. अशा रीतीने इकॅम चा आणखी कार्यविस्तार झाला.
कोरोना सारखी भयंकर महामारी. संपूर्ण जगाचा कारभार बंद पडलाय. पण एक गोष्ट बंद करून चालणारच नव्हती ती म्हणजे विद्युत पुरवठा...! तिथे काम करणारे कर्मचारी हे रात्रंदिवस झटत होते कोणासाठी ? सामान्य जनता जी घरी बसली आहे, ऑन लाइन काम करत होती, पोलिस यंत्रणा जी जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष आहे, वैद्यकीय यंत्रणा जी लोकांना वाचवण्या साठी जिवाचं रान करत होती अशा सगळ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी.... पण या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विचार कोण करणार? जरी सर्वसामान्य लोकांचा त्यांच्या करता जीव तुटत असेल तरी त्यांची मदत कशी करणार? या बिकट प्रसंगी इकॅम नाशिक विभागाच्या संचालकांनी पुढाकार घेतला आणि महावितरण, विद्युत निरीक्षक कार्यालये अशा अनेक ठिकाणी सॅनिटायझरचे पॅडल स्टैंड वितरित करून त्यांच्या बद्दलच कृतज्ञता भाव दर्शवला.... या काळातही संस्थेचा कारभार मिटींग्स नेमाने चालूच होत्या. एरवी वार्षिक सभेला ४००च्या वर उपस्थिती असते पण शासनाच्या निर्बंधांचा आदर करणेही तितकेच आवश्यक असल्याने या मिटींग्स ऑन लाईन घेण्यात आल्या. तिथेही सर्व गोष्टींचा आढावा घेऊन शाखा काय करू शकते यासाठी खटाटोप चालूच होता. कोरोना महामारीत शासनाची अनेक धोरणं बदलली ज्यांची झळ ठेकेदारांना सोसावी लागत होती. त्याचे निवारण करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. २०२१ नंतर म्हणजे करोनाचे सावट गेल्या नंतर खऱ्या अर्थाने लढा सुरू झाला तो ठेकेदारांचा. १.३ स्कीम बद्दल महावितरणा कडे दाद मागून मिळत नाही म्हंटल्यावर अखेर नाईलाजस्तव नाशिक शाखेने कोर्टात जाण्याचा मार्ग अवलंबला. इथल्या सभासदांनी स्वतःच्या खिशातून पदरमोड करत पैसे जमवले आणि कोर्टात वकील लावून सर्व कायदेशीर पद्धतीने केस लढवली आणि जिंकली सुद्धा...! हे जरी नाशिक शाखेने केलं असलं तरी याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टर्सना होणार आहे. ज्या करता नाशिक विभागाची सर्वत्र वाखाणणी केली गेली. एकदा धडाडीने काम करायचं म्हंटलं की कोणतीही गोष्ट असाध्य राहत नाही याचे हे उत्तम उदाहरण. तत्कालीन ऊर्जा मंत्री श्री नितीनजी राऊत नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांची प्रत्यक्ष भेट घेत महावितरण आणि पीडब्ल्यूडी मधील दरपत्रक बाढी बरोबर अन्यही गोष्टीं बद्दल निवेदन दिलं.
आपल्याला जी माहिती अथवा जो संदेश द्यायचा आहे तो केवळ सेमिनार्स, चर्चासत्र, प्रेझेंटेशन, व्याख्यानं याच मार्गाने दिला जाणं गरजेचं आहे का? अर्थात याचे अनन्यसाधारण महत्व मान्यच आहे तरी वेगवेगळे प्रयोग केले तर अधिक प्रभावीपणे काही गोष्टी पोहोचवता येतात. जसे २०२३ मध्ये झालेल्या ऊर्जा परिसंवादामध्ये औपचारिक पद्धतीचे ज्या परिसंवादात्मक गोष्टी होत्या त्यांच्या बरोबर एक नाटक पण सादर केलं गेलं. प्रशिक्षण व सुरक्षेच्या विषयावर जीवंत देखावा या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून श्री संदीप पाचंगे यांनी सादर केला. अशा अभिनव प्रयोगातून अध्यक्ष श्री सचिन फडतरे, सचिवपदी असलेले श्री सुशील भुरे आणि संचालक मंडळाने नाशिक शाखेच्या स्वतःचं वेगळेपण वेळोवेळी सिद्ध केलंय.
या संस्थेचा इतिहास ज्यांच्या कार्याला अभिवादन केल्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ज्यांनी या कार्यात आपल्या अतुलनीय योगदानाच्या आहुत्या कायम समर्पित करत आले आहेत; जे म्हणायला नाशिक विभागाचे पण सगळ्यांसाठीच कायम झटत आले ते कै. सुनील भुरे साहेब...! शाखेच्या पहिल्या दिवसा पासून कायम सगळ्या रिजन्सना जोडून ठेवणारे म्हणून सगळ्यांना परिचित असणारे सुनील भुरे आधी सचिवपदी काम पाहत होते. तेव्हा अध्यक्षपदावर श्री श्यामराव काण्णव होते. या दोघांनीही अथकपणे संस्थेचा कार्यविस्तार चालू ठेवला. त्यानंतर सुनील भुरे महाराष्ट्रच्या महासचिव पदी विराजमान झाले. तिथेही त्यांनी कामाचा असाच धडाका चालूच ठेवला. पुढे ते महाराष्ट्राचे प्रेसिडेंट या पदावर विराजमान झाले. त्या कार्यकालात पूर्वी मुंबईत असलेले ठाणे आणि कोकण असे दोन नवीन रिजन निर्माण झाले. जे अर्थात यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झालं. आज या संस्थेचे शतकपूर्ती महोत्सवी वर्ष साजरे करायचे यासाठी सुद्धा त्यांनी खूप काम करून ठेवलं होतं. त्यामुळे सगळ्यांची अगदी मनापासून अशी इच्छा होती की या शतकपूर्तीच्या महोत्सवा प्रसंगी सुनील भुरे यांनीच मुंबईचे प्रेसिडेंटपद भूषावावे. ज्यांच्या निस्वार्थ परिश्रमांमुळे संस्थेचा कार्यविस्तार चहू बाजूंनी झालाय तेच या प्रसंगी प्रेसिडेंट पदी विराजमान असणे ही गोष्ट म्हणजे संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा. पण शरीर स्वास्थ्य कारणास्तव त्यांना हे पद नाही स्वीकारता आलं. सुनील भुरे यांचा असाही मानस होतं की इकॅम ही संस्था फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित न राहता ती राष्ट्रीय पातळीवर जावी, बाकीच्या संस्था यात जोडल्या जाव्यात या साठीही ते अथक प्रयत्न करीत होते. पण कधी कधी काही माणसं आपलं कार्य एका विशिष्ट पातळी पर्यन्त आणून ठेवतात आणि उरलेली जबाबदारी इतरांसाठी ठेऊन या जगाचा निरोप घेतात......
त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक रिजनने प्रदर्शनाच्या अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रवेशद्वाराला सुनील भुरे साहेबांचा फोटो आवर्जून लावत त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईला जो भव्य शतकपूर्ती महोत्सव होणार आहे तिथे सुद्धा प्रवेशद्वाराला त्यांचेच नाव आणि फोटो असणार आहे. ज्यांच्या परिश्रमातून ही संस्था इतकी मोठी झाली त्यांना अभिवादन करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याने इतरांसाठी जो मार्ग निर्माण केला तो आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे......
संस्थेबाहेरच्या कोणाला असा विचार येऊ शकतो की हा सगळं खटाटोप काही व्यावसायिक एकत्र येऊन स्वतःच्या फायद्या करता करत आहेत. त्याचा समाजाला काय फायदा ? पण त्यांच्या समाज उपयोगी समर्पण भावावर असा त्रोटक विचार करणे हे अन्यायकारक ठरेल. आपली व्यावसायिक म्हणून उन्नती व्हावी हा विचार चुकीचा नाही कारण त्यातूनच रोजगार निर्मिती होत असते. अनेक लोकांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होतं. जी एका निकोप समाजासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. देशाचा कारभार पुढे चालत राहतो आणि एकंदर अर्थकारणात आपलेही योगदान दिले जाते. या शिवाय जेवढे टॅक्स भरले जातात त्याचीही गणती नक्कीच केली गेली पाहिजे. येवढं असूनही दोन पावलं पुढे जात इकॅम नाशिक विभागाने एक अत्यंत स्तुत्य काम केलं. विख्यात अभिनेते श्री नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी एक सामाजिक संस्था स्थापन केली जीच नाव आहे नाम! यांनी समाजिक आणि पर्यावरणासाठी पुढाकार घेत लोकांना आवाहन केलं की या कार्याला स्वेच्छेने मदत करा. तेव्हा नाशिक शाखेच्या कार्यकारणीने आपणहून वर्गणी काढून या नाम' संस्थेला ५१००० रुपयांची आर्थिक मदत पाठवली. शाखेच्या मंडळींनी पर्यावरणाचे संगोपन व्हावे या करता नाशिक जवळच्या लहवीत गावी वृक्षारोपण केले. या काही गोष्टी बघितल्या तरी लक्षात येतं की यांची मूळ भूमिका ही सर्वोपकरक आहे. कोणा एका घटकाचा फायदा व्हावा म्हणून ही चाललेली धडपड नसून कोणाचेही नुकसान होऊ नये असाच त्या मागचा उद्देश आहे. जकात कमी करावी यासाठी झटणारी ही संस्था पर्यायाने ग्राहकाला बसणारा भुर्दंड वाचवण्यासाठीही प्रयत्नशील असते. ह्या बाजूने विचार केला तर जाणवतं ही की इकॅम ही केवळ संस्था नसून समाजाप्रती असलेली आस्था आहे...... अशा योगदानाच्या सांगता येण्या सारख्या असंख्य गोष्टी आहेत. त्या पैकी काही उल्लेखनीय गोष्टींचा हा लेखाजोखा. एवढ्या वरुनही सुद्धा आपल्या लक्षात येईल की एकंदर या संस्थेच्या कामाचा आवाका किती आवश्यक आणि व्यापक आहे. काळ जसा पुढे जातो तसतशा नवनवीन अडचणी डोकं वर काढत जातात आणि संस्था म्हणून प्रत्येकवेळी आपल्याला तत्परतेने त्याचा बंदोबस्त करावा लागतो. बरं ते तेवढ्यावरच थांबत नाही तर त्याचे तपशील दस्ताऐवज सांभाळून ठेवावे लागतात कारण कुठे त्याचा संदर्भ घ्यावा लागेल हे सांगता येणे काठीण. पुन्हा तो सगळं दस्ताऐवज काळानुरूप बदलत्या फॉर्म मध्ये जतन करून; जसे पूर्वी सगळं कागदोपत्री व्यवहार चालत ते आता डिजिटल झालंय, पुढे आणखी काही वेगळ्या स्वरुपात होईल पण जतन करण्याची जबाबदारी संस्थेचीच. याचा अर्थ समस्या सुटली म्हणजे आपण सुटलो असा होत नाही. कुठलीही संस्था वर्गणी म्हणून देणगी म्हणून चालवली जाते ती पदरमोड करूनच. याच्या उपर जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा लोक आपला खिसा रिकामा करायला मागे पुढे पाहत नाहीत. हा सर्व खटाटोप म्हणजे काम कोणाचं आणि दाम कोणाचा असाच चालतो. पण समाजहित साधण्याच्या कामी याचा विचार कोणी करत नाही म्हणूनच संस्था विभाग जोमानं काम करू शकते. कोणतेही तंत्र विकसीत होते ते काम अधिक सुलभतेने व्हावे म्हणून. पण तांत्रिक काम करणारे लोकच अडचणीत आले तर त्यांच्या कामातले अडथळे दूर व्हावेत कसे? तर ते दूर करण्याचे एक वेगळेच विकसीत झालेले इंजिनियरिंग म्हणजे इकॅम !
या नंतर नाशिक शाखेसाठी खरोखर आनंदाची गोष्ट म्हणजे या शाखेचा रौप्य महोत्सव...! १९८९ ला स्थापन झालेल्या या शाखेला कार्यरत होऊन २५ वर्ष पूर्ण झाली सुद्धा... १ ही गोष्ट सत्य असूनही आश्चर्य चकित करत होती. इतरां करता कार्य करण्यात गढून गेलेले ही मंडळी, आपल्याच २५ वर्षांच्या इतिहासाकडे चकित होऊन पाहत होती. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर सुशील भुरें सारखे लोक जे तेव्हा कॉलेज मध्ये शिकत होते. काण्णव साहेबांच्या कार्याचा अशा विद्यार्थी दशेत असलेल्या तरुणांवर खूपच प्रभाव पडला. त्यात सुनील भुरे यांच्या सारखे कार्यरत असलेले बंधु म्हंटल्यावर सुशील भुरें सारखे तडफदार कार्यकर्ते तयार होणारच. १९९७ साली आयोजित केलेल्या ECMEX प्रदर्शनात दिवसभर राबुन पुन्हा रात्रीची राखणदारी करायला सुशील भुरे आणि सहकारी तत्पर असत. तेव्हा पासून यांच्या कार्याला सुरवात झाली. छोट्यामोठ्या सर्व प्रकारच्या जबाबदर्या अंगावर घेऊन पार पाडायच्या हा संस्कार या लोकांनी दिला. पण सांगकाम्या म्हणून नाही तर शाखेच्या जबाबदयकचा वाढता डोलारा कसा सांभाळायचा याचीही शिकवण दिली जी आजही आणि इथून पुढेही कायम राहील. त्यामुळेच गेल्या ३ वर्षांकरता आणि यंदाही नाशिक शाखेचे सचिव पद सुशील भुरे सक्षमपणे सांभाळत आहेत. असा सगळ्यांनीच हा भागीरथ प्रयत्न सातत्याने चालू ठेवलाय हा विचार करता मन कृतकृत्य होतं.
रौप्य महोत्सवी वर्षांची वार्षिक सर्व साधारण सभा विशेष होती. २५ वर्षांचा दिमाखदार कार्यकाल पार पडला या निमित्त एक सांगीतिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेचेच सदस्य अनिरुद्ध कुर्तडीकर जे प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत त्यांचा खास गाणी सर्वांच्या आवडीची हा कार्यक्रम नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्या रौप्य महोत्सवी वर्षांत अध्यक्षस्थानी होते श्री देवांग ठाकुर आणि सचिव पदी होते श्री रावसाहेब रकिबे. या संचालक मंडळाने कामाचा असा धडाका लावला की इकॅमच्या इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक घटना नोंदवली गेली. ती म्हणजे एकाच वेळी १२३ नवीन मेंबर्स जोडले गेले. नगर खांदेश रिजन वेगळा झाल्या नंतर जी संख्या घटली होती ती अशा रीतीने भरून निघाली. जणू नाशिक शाखेने संस्थेचे ऋण फेडत इकॅमला रौप्य महोत्सवी वर्षातली दिमाखदार भेट दिली १२३ सभासदांच्या रूपात. आपण चांगल्या हेतूने कार्य करत असल्यास आपल्याला मिळणारे परिणामही चांगलेच असतात. याच वर्षात इकॅम आणि फे-कॅम संयुक्त ने शासनाच्या एकत्रित निविदांच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली होती त्याचाही निकाल संस्थेच्या बाजूने लागल्याने हे रौप्य महोत्सवी वर्ष सर्वार्थाने लाभदायकच ठरले....
त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक रिजनने प्रदर्शनाच्या अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रवेशद्वाराला सुनील भुरे साहेबांचा फोटो आवर्जून लावत त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईला जो भव्य शतकपूर्ती महोत्सव होणार आहे तिथे सुद्धा प्रवेशद्वाराला त्यांचेच नाव आणि फोटो असणार आहे. ज्यांच्या परिश्रमातून ही संस्था इतकी मोठी झाली त्यांना अभिवादन करणे हे। आपले आद्य कर्तव्यच आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याने इतरांसाठी जो मार्ग निर्माण केला तो आदर्शवत आणि प्रेरणादाईच आहे. या वर्षी शामराव काण्णव साहेबांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला. या दोघांनी इतरां करता केलेल्या कार्या मुळे त्यांना सद्गती प्राप्त होईलच पण त्यांच्या माघारी इतरांना संस्थेचा कार्यविस्तार करण्याची अखंड प्रेरणा मिळत राहील यात शंका नाही....

NASHIK

NASHIK REGIONAL EXECUTIVE COMMITTEE

Name Designation Company Name Mobile No.
Shri Sachin Fartade Chairman Yash Enterprises & Electricals 9823281170
Shri Sushil Bhure Secretary Saudamini Engineers & Contractors 9422253357
Shri Sandip Shinde Treasurer Yash Electrical Engg. & Contractor 9823281169
Shri Raosaheb Rakibe Past Chairman Praj Electrical Services 9823168563
Shri Manoj Pawar Member Prabha Electricals 9890671810
Shri Dhananjay Patil Member A. B. Electrical Works 9373593777
Shri Samarth Nikam Co-opt Member Shree Samarth Electricals 9422254877
Shri Sandip Dhande Co-opt Member S. P. Power Enterprises 9422270903
Shri Suraj Ahire Co-opt Member Sutej Electricals 9850852741
Shri Samadhan Patil Special Invitee Narmraj Electricals 9822661171
Shri Amey Kannav Special Invitee R.Y.B. Electricals 9860023349
Shri Pramod Sonawane Special Invitees Nashik Cables & Electricals 9049933033
Shri Bharat Deore Special Invitees Renuka Electrical & Electronics 9766480537
Shri Nitin GangurdeS Special Invitees Lokmanya Enterprises 9422747681
Shri Sandip Kundaria Special Invitees S. T. Kundariya 9422705443
Shri Sumit Sajnule Special Invitees Radical Electricals 9822307666
Shri Vilas Gawade Special Invitees Peenack Enterprises 9850970110
Shri Aniruddha Kurtadikar Special Invitee Anivind Enterprises 9763255055
Shri Sunil Bhure Special Invitee Trimurti Engineers (India) 9850970114
Shri Shailendra Gujar Special Invitee Mayur Electro Enterprises 7588027218
Shri Devang Thakur Special Invitee Devang Electricals 9422249672
ROLE OF HONOUR

CHAIRMAN

Sr. No. Name Years Profile
1 Jaysinghbhai Aladiya 1989 - 1992
2 Mr. Raghunath Ahirao 1992-1995
1998-2004
3 Mr. Shyam Kannav 1995 - 1998
4 Shri Baban Choure 2004-2007
5 Shri Chandrakant Choudhari 2007-2009
6 Mr. Sunil Bhure 2009-2013
7 Shri Devang Thakur 2013-2016
8 Shri Raosaheb Rakibe 2016-2019
9 Shri Sachin Fartade 2019 To Till date

HONORARY SECRETARY

Sr. No. Name Years Profile
1 Mr. Shyam Kannav 1989 - 1995
2 Mr. Sunil Bhure 1995 - 1998
3 V. V. Gujrathi 1998 - 2001
4 Shri Baban Choure 2001-2004
5 Mr. Mohan Pawar 2004-2007
6 Shri Devang Thakur 2007-2013
7 Shri Raosaheb Rakibe 2013-2016
8 Shri Sachin Fartade 2016-2019
9 Shri Sushil Bhure 2019 To Till date

Our GALLERY

Go To Top