सन १९९७ पर्यंत अहमदनगर विभाग हानाशिक विभागा अंतर्गत उपविभाग म्हणून नगर विभागाचे कामकाज चालू होते. नाशिक विभागाचे स्व. जयसिंगभाई अलादिया व पुणे विभागाच्या सहकार्याने आपल्या संस्थेच्या घटनेप्रमाणे ५५ सभासद संख्यापेक्षा अधिक सभासद संख्या करून अहमदनगर विभागाचे स्थापनेसाठी मुंबई मुख्य कार्यालयात प्रस्ताव दिला, परंतु त्यांच्या नकारात्मक धोरणामुळे थोडा जास्तच वेळ लागला, परंतु स्व. सुधाकर शेठ, पुणे व पुणे विभागाच्या कार्यकारणीचे सदस्य श्री. चितळे, स्व. ओसवाल, स्व. साने, नाशिक विभागाचे स्व. अलादिया, श्री. शाम कण्णव, स्व. नाना अहिरराव, मुंबई महाराष्ट्र इकॅमचे प्रेसिडेन्ट श्री. शैलेश डॉक्टर, श्री. काझी ह्या सर्वांच्या सहकार्याने दिनांक ०४.०७.१९९८ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन एम.एस.ई.बी. श्री. अशोक बसाक ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच नगर विभागातील सभासद स्व. अशोक गांधी, श्री. मधुकर चव्हाण, श्री. श्रीकृष्ण कुलकर्णी, श्री. हरिश्चंद्र शिंदे, श्री. गोकुळ बोळेफोड व मुंबई संचालक प्रेसिडेन्ट श्री. शैलेश डॉक्टर, श्री.
काझी, पुणे- नाशिक विभागातील कार्यकारणी सदस्य ह्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला व नगर विभागाचे प्रथम चेअरमन श्री. मधुकर चव्हाण विभाग स्थापनेनंतर सर्व सभासदांच्या सहकार्यांने प्रदर्शन भरवून काही निधी गोळा केला व त्या निधीतून राज चेंबर, कोठला स्टैंड येथील एका इमारतीमध्ये ऑफिस खरेदी केले. सन २०११ साली श्री. केशव काळे ह्यांनी चेअरमन पदाची धुरा स्विकारल्यानंतर नगर विभागाची वाटचाल एका वेगळ्याच दिशेने सुरु झाली. सभासद संख्या एक-एक बाढवत १५० वर नेली. नंतर मात्र श्री. उमेश रेखे, श्री. बाळासाहेब डुकळे, श्री. अर्जुन ससे, श्री. मनोहर शहाणे, श्री. दत्ता झिंजुर्डे, श्री. देवकांत देवढे, श्री. अमोल कोळपकर, श्री. अमित गरुड, श्री. संदिप डोळस, श्री. जितेंद्र तोरणे, श्री. सागर तलवार असे अनेक तरुण सभासद संघटनेत सहभागी झाले व संघटनेसाठी मोलाचे योगदान देऊ लागले. प्रदर्शने, प्रभात फेरी, इलेक्ट्रीकल वस्तूंच्या कंपनीमध्ये सदिच्छा भेटी, सुरक्षा सप्ताहाचे आयोजन, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सभासदाच्या समस्याचे निराकरण करणे, विविध विषयावर चर्चासत्रे असे विविध कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून होऊ लागले. त्यामुळे आज सभासद संख्या २७२ पर्यंत पोहचली आहे आणि यापुढे ही सभासद संख्या वाढविण्यात येणार आहे.
संघटनेचे राज चेंबर येथील कार्यालयाची जागा अपुरी बाटू लागली, त्यामुळे सर्वानुमते नवीन जागा घेण्याचा विचार आला.
सन २०१५ मध्ये चेअरमन श्री. गोकुळ बोकेफोड ह्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात संघटनेचे जुने कार्यालय विकले व विकून आलेली रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरुपात ठेवण्यात आली व त्यानंतर नवीन जागेचा शोध सुरु झाला. जागा शोधण्यात चार वर्षे गेली, कारण संघटनेकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता व जागेच्या किंमती दिवसागणिक वाढत जात होत्या. त्यामुळे नवीन जागा घेण्यास उशीर होत होता. दरम्यानच्या काळात संघटनेने दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सभेत प्रदर्शने व अहवाल छपाईच्या माध्यमातून संघटनेच्या उत्पन्नात भरिव वाढ केली. सन २०१७ साली श्री. उमेश रेखे ह्यांच्या रुपाने एक तरुण तडफदार नेतृत्व चेअरमन म्हणून लाभले. संघटनेत पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली. ह्या काळात श्री. दत्ता झिंजुर्डे, श्री. अमोल कोळपकर, श्री. बाळासाहेब (तात्या) दुकळे, श्री. जितेंद्र तोरणे, श्री. अमित गरुड, श्री. आबा देवढे, श्री. संदिप डोळस असे अनेक तरुण सभासद संघटनेत सक्रिय झाले. दरम्यानच्या काळात चेअरमन श्री. उमेश रेखे, श्री. मनोहर राहाणे, श्री. अर्जुन ससे व सर्व संचालक व पदाधिकारी ह्या सर्वांच्या प्रयत्नाने आपणास नगर कल्याण रोडवर मेडिकल असोसिएशनच्या शेजारी नऊ गुंठे प्लॉट मिळाला, पण प्लॉटची किंमत खूपच जास्त होती. मग अर्ध्या प्लॉटसाठी कोणी भागीदार मिळतो का हे देखील पाहण्यात आले, परंतु असे काही घडले नाही. शेवटी प्रत्येक सभासदाने भरिव स्वरुपात देणगीने संघटनेला मदत केली व त्यामुळे संपूर्ण नऊ गुंठे जागा संघटनेसाठी घेण्याचा निर्णय झाला, पण तरी सुद्धा काही रक्कम अपुरी पडत होती. दरम्यानच्या काळात नगर विभागाचे श्री. केशव काळे हे इकॅम महाराष्ट्राचे सर्व प्रथम प्रेसिडेन्ट मुंबई बाहेरचे झाले होते. त्यांच्या पाठपुराव्याने आपणांस मुख्य कार्यालय यांच्याकडून परतफेडीच्या स्वरुपात दहा लाख रुपये मिळाले.
तरी देखील अजून काही रक्कम कमी पडत होती. अशावेळी संघटनेचे पदाधिकारी श्री. बाळासाहेब दुकळे, श्री. प्रदिप वाव्हळ, श्री. उमेश रखे, श्री. अर्जुन ससे, श्री. जितेंद्र तोरणे यांनी परतफेडीच्या बोलीवर मदत करुन सदर जागेचा व्यवहार पूर्ण केला. अशाप्रकारे आपल्या संघटनेची स्वतःच्या मालकीची जागा होऊ शकली. सदर जागेवर ऑफिस, मिटींग हॉल, सांस्कृतिक भवन बांधण्याचे निश्चीत केले आहे. त्याची रितसर महानगर पालिकेची परवानगी देखील घेतली आहे. पुढील वर्षभरात सर्व बांधकाम पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील सभासदांसाठी राहण्याच्या दृष्टीने विश्रामगृह देखील बांधण्याचा मानस आहे.
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अहमदनगर विभागाची 25 वी वार्षिक सभा मोठ्या थाटामाटात पार पडली.
दिनांक ७ ऑक्टोबर 2023 रोजी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अहमदनगर विभागाची 25 वी वार्षिक सभा हॉटेल संजोग अहमदनगर येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी बारा वाजता झाली कार्यक्रमाचे ठिकाणी इलेक्ट्रिकल उत्पादनांचे प्रदर्शन भरण्यात आले होते त्यावेळी प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे श्री हापसे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी उपस्थित होते प्रदर्शनासाठी अडसूळ कॉलेज विखे पाटील कॉलेज छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच शासकीय तांत्रिक विद्यालयाचे विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट दिल्या सदरहू प्रदर्शनास 18 विविध कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांचे स्टॉल लावले होते त्यात प्रामुख्याने के ई आय इंडस्ट्रीज टू पावर काबिल प्रथमेश ट्रांसफार्मर विके आलो आईस कण्डक्टर सुजित इंडस्ट्रीज विशाल केबल आयडियल इंजिनिअरिंग गाला जॉईंट किट प्रोटोप लास्ट केबल इंटर केबल पावरट्रेक अर्थिंग श्री इंजिनिअरिंग सवेरा एलईडी मेघा इंजिनिअरिंग शिवचैतन्य सोलर तिरुपती एंटरप्राईजेस या कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात झाली यामध्ये सुप्रिया उगले जोशी मॅडम यांच्या नृत्यालयाच्या मुलींनी गणेश वंदना सादर केली त्याचबरोबर श्री संदीप भुसे सर यांच्या टीमने काही सुंदर गाणी गायली वरील सर्व कार्यक्रमास संघटनेची सभासद व त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली कार्यक्रमात रुद्र आणि गरुड कुस्ती या सभासदांच्या मुलींनी नृत्य सादर केली.व वार्षिक सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष श्री सुनील भुरे तसेच संघटनेची माजी संचालक बाळासाहेब आरडे व इतर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सभेचे अध्यक्ष स्थान श्री दत्ता झिंजुर्डे यांनी भुषवले सदर सभेसाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री वामन बुरे महाराष्ट्र राज्य महासचिव श्री देवांग ठाकूर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.उमेश रेखे, नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री सचिन फडतरे ,पुणे विभागाचे अध्यक्ष श्री अमर पाटील ,जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री बाबू मेहदी ठाणे विभागाच्या अध्यय श्री निलेश तीवर मकर, धुळे विभागाच्या उपाध्यक्ष श्री किरण बेंढारकर नगर विभागाचे माजी अध्यक्ष श्री मनोहर शहाणे नगर व नगर विभागाचे सचिव श्री अर्जुन ससे उपाध्यक्ष श्री अमोल कोळपकर खजिनदार श्री बाळासाहेब दुकळे संचालक श्री संदीप डोळस श्री संभाजी निमसे श्री.जितेंद्र तोरणे ,श्री अनिल घाडगे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नगर विभागाचे सुमारे 200 सभासद सहकुटुंब सभेला उपस्थित होते.
सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 25 वर्षानिमित्त 1995 पूर्वीचे ज्येष्ठ सभासद यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 25 व्या वर्षानिमित्त संघटनेतर्फे सुंदर अशी भेटवस्तू प्रत्येक सभासद असतानात आली 2023 ते 2026 या सालासाठी संचालक म्हणून श्री श्रीकांत देवडे व श्री राहुल सप्रे यांचे बिन विरोध निवड झाली श्री दत्ता झिंजुर्डे यांनी अध्यक्ष भाषण केले ,वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित गरुड यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अमोल कोळपकर यांनी केले व स्नेह भोजनाने सभेची सांगता झाली.. 🙏💐
Sr. No. |
Name |
Years |
Profile |
1 |
Shri. Srikrishna Kulkarni |
1998 - 2008 |
|
2 |
Shri. Harishchandra Shinde |
2008 - 2015 |
|
3 |
Shri. Manohar Shahane |
2015 - 2018 |
|
4 |
Mr. Balasaheb Dukale |
2018 - 2022 |
|
5 |
Mr. Arjun Sase |
2022 To Till Date |
|