E C A M I N D I A

Regions

इकॅम जळगाव विभागाचा इतिहास

जळगाव हे आधी नाशिक विभागामध्ये होते, २००९ मध्ये श्री स्व. नितीन पवार, श्री रवींद्र चौधरी, व श्री अनिरुद्ध नांदोडे हे नाशिक विभागात कार्यकारणीत कार्यरत होते. जळगाव मधील आपल्या सभासद कॉन्ट्रॅक्टर बंधू यांच्या मागणी वरून श्री स्व. नितीन पवार साहेब यांनी जळगाव साठी स्वतंत्र विभागाची मागणी केली. त्यात श्री रवींद्र चौधरी व श्री अनिरुद्ध नांदोडे यांनी श्री स्व. नितीन पवार साहेबांसोबत या साठी खूप पाठ पुरवठा केला व २०११ रोजी खान्देश विभाग घोषित करण्यात आला.
खान्देश विभागाची मान्यता मिळाल्या नंतर धुळे येथे मे गुरुप्रसाद इलेकट्रीकल्स यांच्याकडे पहिली सभा घेण्यात आली. यावेळी कमिटीच्या निर्णयानुसार श्री. नितीन मधुकर पवार यांना खान्देश विभागाचे पहिले अध्यक्ष व सचिव म्हणून श्री रवींद्र बळीराम चौधरी यांची नियुक्त करण्यात आली.
इकॅम खान्देश विभागाचा उदघाटन सोहळा दि. १७.०४. २०११ रोजी हॉटेल मैत्रीयाज, औद्योगिक वसाहत, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. खान्देश विभागाचे उदघाटन सां. बा. खात्याचे मुख्य अभियंता मा. श्री. सुरेश वेलेकर व मा. श्री संदीप पाटील अधीक्षक अभियंता मुंबई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, या सोहळ्यात इकॅम मुंबई अध्यक्ष श्री पंकज मुनी उपाध्यक्ष श्री चंद्रकांत ब्रीद, महासचिव श्री कमलेशभाई शाह, खजिनदार श्री. सुनील सराफ. श्री अशोक गांधी, श्री राजीव जातकर, श्री सुनील भुरे, व खान्देश विभागाचे अध्यक्ष श्री नितीन पवार व सचिव श्री रवींद्र चौधरी तसेच इकॅम मुंबई, पुणे, नाशिक, नगर विभागाचे पदाधिकारी व खान्देश विभाचे सभासद उपस्थित होते.
खान्देश विभागाने उड इलेक्ट्रिक च्या वतीने टेक्निकल प्रेझेंटेशन व लो वोल्टेज व मिडीयम वोल्टेज स्वीचगेअर प्रॉडक्ट संबंधी सेमिनार घेण्यात आला. या सेमिनार चे आयोजन जळगाव येथील हॉटेल सिल्वर पॅलेस, रेल्वे स्टेशन रोड येथे करण्यात आले होते.
या तांत्रिक कार्यक्रमासाठी महावितरणचे मुख्य अभियंता श्री प्रसाद रेशमे व अधीक्षक अभियंता श्री शिंदे साहेब हे प्रमुख अतिथी होते याप्रसंगी खानदेश रिजनचे अध्यक्ष श्री रविंद्र चौधरी व सचिव श्री शशिकांत झारे व कार्यकारणी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इकॅम खानदेश विभागातर्फे सभासदांसाठी हलोल गुजरात येथे पॉलीकॅब वायर्स अँड केबल यांच्या उद्योग समूहास तांत्रिक भेट करण्यात आली, यासाठी इकॅम मुंबई चे श्री सतीश काजी यांचे प्रयत्नांमुळे ही भेट शक्य झाली यासाठी खानदेश विभाचे अध्यक्ष श्री रवींद्र चौधरी व सचिव शशिकांत झारे व कार्यकारणी यांचे त्यात योगदान होते, हलोल पासून जवळ असलेले पावागढ येथे ही देवीचे दर्शनाचा लाभ झाला खानदेश विभागाच्या सभासदांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. खानदेश विभागामधून धुळे व नंदुरबार हा वेगळे एक स्वतंत्र विभाग स्थापन झाल्यानंतर खानदेश विभागाचे नाव जळगाव विभाग म्हणून जाहीर करण्यात आले जळगाव विभागातर्फे ११ ते १७ जानेवारी २०१७ या काळात महाराष्ट्र शासन ऊर्जा खाते व इकॅम जळगाव विभाग यांच्या संयुक्तपणे विद्युत सुरक्षा सप्ताह राबवण्यात आला यात जळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील तारतंत्री व वीजतंत्री या ट्रेड चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते या विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त इकॅम जळगाव विभागा तर्फे शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली होती या रॅलीसाठी जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री नितीन पवार व उपाध्यक्ष श्री अमित टोके व श्री अनिरुद्ध नांदोडे, श्री विजय बेंडाळे व सर्व कार्यकारणीचे मोठे सहकार्य होते, या रॅलीच्या समारोप जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील जीएस ग्राउंडवर करण्यात आला होता. इकॅम जळगाव विभागातर्फे दिनांक ११.३.२०१७ रोजी रेऑन एलुमिनेशन अँड एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद व जीएसटी विषयी जळगाव येथील जेष्ठ लेखापरीक्षक श्री मदन पाटील यांचे मार्गदर्शनासपद व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मुंबई इकॅम चे उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध नांदोडे हे उपस्थित होते श्री मदन पाटील यांनी विक्रीपासून ते नवीन कर प्रणाली वस्तू सेवा कर लागू होण्यापर्यंत कसे बदल होत गेले याविषयी सोप्या भाषेत समजावून सांगितले यानंतर रेऑन कंपनीचे संचालक श्री सुनील बडे यांनी रेऑन कंपनीचे उत्पादने एलईडी फिटिंग व सोलर लाईट विषयी प्रोजेक्टर द्वारे माहिती दिली या कार्यक्रमास जळगाव विभागाचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दिनांक २९.१०.२०१७ रविवार रोजी हॉटेल कमल पॅराडाईज भुसावळ रोड, जळगाव येथे रिले ऑन सोलर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष कार्यकारी संचालक व जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ माननीय श्री गुड्डू साबदे साहेब यांचे सोलर ऊर्जा या विषयावर त्यांचे मार्गदर्शनास्पद व्याख्यानाचे आयोजन केले होते यासाठी जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री नितीन पवार व श्री अनिकेत पवार यांच्या प्रयत्नामुळे सभासदांना याचा लाभ घेता आला. दिनांक ०५.०५.२०२२ रोजी महावितरण कडून लेट होत असलेल्या पेमेंट साठी इकॅम जळगाव विभागाने सर्व कामे बंद करून मुख्य अधीक्षक अभियंता महावितरण जळगाव ऑफिसच्या समोर उपोषण करण्यात आले होते या उपोषणाला जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री बाबुभाई मेहदी उपाध्यक्ष श्री अमित टोके सचिव श्री अनिकेत पवार व सभासद बंधू उपस्थित होते.
दिनांक २१.१०. २०२२ रोजी महावितरणचे मुख्य अभियंता श्री कैलास हुमणे साहेब यांना कॉन्ट्रॅक्टर बंधूंचे प्रलंबित पेमेंट संदर्भात व आंदोलन करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले तसेच दिनांक २१.१०.२०२२ रोजी महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री राजेंद्र मारके साहेब यांना आंदोलन करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले व त्या संदर्भात चर्चा करण्यात आली त्यावेळी जळगाव रिजनचे अध्यक्ष श्री बाबुभाई मेहदी, उपाध्यक्ष श्री अमित टोके, सचिव श्री अनिकेत पवार, खजिनदार श्री आनंद विरघट, कार्यकारणी व सभासद उपस्थित होते. दिनांक १२.१२.२०२२ रोजी इकॅम जळगाव विभागा कडून इम्पॅनलमेंट एजन्सी प्रीवेंटिव्ह, ब्रेकडआउन व ऋ पॉलिसी चे मागिल सहा महिन्या पासून पेमेंट मिळत नसल्याने माननीय मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता जळगाव यांना निवेदन देण्यात आले व सर्व ठेकेदार बंधुचे पेमेंट लवकर अदा करण्यात यावे व MO, PO व बजेट संदर्भात येणाऱ्या अडचणी संदर्भात निवेदन देण्यात आले त्यावेळी जळगाव रिजन अध्यक्ष श्री बाबुभाई मेहंदी उपाध्यक्ष श्री अमित टोके सचिव श्री अनिकेत पवार व सभासद उपस्थित होते.
याप्रकारे असोसिएशनने वेळोवेळी केलेल्या आंदोलन व निवेदनामुळे जळगाव विभागातील सर्व ठेकेदार बंधूंचे प्रलंबित असलेले चज, झज व पेमेंट महावितरण कडून देण्यात आले व आपल्या ठेकेदार बंधूंना न्याय मिळाला हे सर्व फळ असोसिएशन व सर्व सभासद बंधूंची एकजूटी मुळे साध्य झाले.

JALGAON

JALGAON REGIONAL EXECUTIVE COMMITTEE

Name Designation Company Name Mobile No.
Shri Sayyed Mehdi Chairman Star Electricals 9823293405
Shri Amit Toke Vice-Chairman Amit Enterprises 9326971018
Shri Aniket Pawar Secretary Dhanshree Industries 9867652025
Shri Anand Virghat Treasurer Virgat Electricals 9356440773
Shri Ravindra Chaudhary Past Chairman Milind Electric Works 9822638202
Shri Rajesh Sapkal Member New Khandesh Electrical 9421835691
Shri Kunal Patil Member Shri Vyanktesh Traders 8275518252
Shri Manish Chavan Co-opt Member Mangalmurti Engineering Co. 7276505977
Shri Sushant Shukla Co-opt Member Varad Engineers and Contractors 9130752557
Shri Suresh Choudhary Co-opt Member Chaudhary & Associates 9226051623
Shri Santosh Suryavanshi Co-opt Member Shree Trivikram Constructions 9422771416
Shri Sunil Lohar Special Invitees Chiu Electricals 9422278167
Shri Hemant Pathak Special Invitees Mahalaxmi Elect.Engineers & Contractor 7666620158
Shri Deepak Nikam Special Invitees Pranav Traders 9423936802
Shri Liladhar Rade Special Invitees Chetan Electricals & Works 9423973105
Shri Mohit Choudhary Special Invitees Radical Electricals 9922009101
Shri Amol Ingale Special Invitees Shri Ramkrishna Engineers 9665510100
Shri Mayur Rane Special Invitee Kashish Electrical Pvt. Ltd 9975768861
ROLE OF HONOUR

CHAIRMAN

Sr. No. Name Years Profile
1 Kai Nitin Pawar 2011 - 2012
2015 - 2018
2019 - 2022
2 Mr. Ravindra Chaudhary 2012 - 2015
3 Mr. Amit Toke 2018 - 2019
4 Mr. Babubhai Mehdi 2022 To Till date

HONORARY SECRETARY

Sr. No. Name Years Profile
1 Mr. Ravindra Chaudhary 2011 - 2012
2 Mr. Shashikant Zare 2012 - 2019
3 Mr. Babubhai Mehdi 2019 - 2022
4 Mr. Aniket Pawar 2022 To Till date
GALLERY

Our GALLERY

Go To Top