E C A M I N D I A

Regions

इकॅम धुळे नंदुरबार विभागाचा इतिहास

सन २०१४-१५ मध्ये धुळे विभागाची स्थापना झाली. धुळे विभाग हा सुरुवातीला खान्देश रिजन (जळगाव रिजन) मध्ये होता. पण धुळे विभागाची सभासद संख्या जास्त असल्यामुळे धुळे येथिल सभासदानी आपला विभाग हा वेगळा करावा अशी मागणी इकॅम महाराष्ट्र यांचे कडे केली त्यानंतर इकॅमचे अध्यक्ष श्री. मुनी साहेब व त्या नंतरचे अध्यक्ष श्री. ब्रीद साहेब यांनी धुळे विभागाला मान्यता दिली. श्री. ब्रीद साहेब, श्री. गचके साहेब हे स्वतः धुळे येथे येवून त्यांनी धुळे विभागार्थी स्थापना केली व तसे पत्र दिले. सुरुवातीला अस्थायी कमिटी स्थापन करुन श्री. नाना अहिरराव यांचे कडे कार्यभार दिला. दिनांक २७/०५/२०१५ रोजी अस्थायी कमिटीची सभा झाली. दिनांक १५/०९/२०१५ रोजी उदघाटन सोहळा झाला. नाना अहिरराव है पहिल्या वर्षी धुळे विभागाचे चेअरमन म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यावेळी श्री. चंद्रकांत दादा चौधरी यांनी सचिव म्हणून काम पाहिले, त्यांचे बरोबर श्री. दिलीपभाऊ बडगुजर माजी उपाध्यक्ष इकॅम महाराष्ट्र, विनोदभाई गुजराथी व काशिनाथभाई पटेल याची कार्यकारीणी होती. पहिल्या वर्षी AGM इंॉटेल रेसिडेंसी पार्क येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी इकॅमचे सर्व संचालक मंडळ हजर होते.
सुरुवातीच्या वर्षात संपूर्ण इकॅम धुळेच्या वरिष्ठांनी सभासद संख्या वाढण्यास भर दिला. प्रत्येक नविन सभासदांच्या घरी जावून इकॅम संघटना काय काम करते ? सभासदांचे फायदे काय आहेत ? हे समजावून सांगणे व त्यांना सभासद करून घेणे, हे काम जोमाने केले, तसेच दर महिन्याला सभा घेवून सभासदांच्या अडचणी, जसे PWD, MSEDCL बाबतच्या समस्या सोडविणे इ. कामे केली. वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांसोबत वाईटपणा घेतला.
सन २०१६-१७ मध्ये श्री. सुभाष पाटील हे चेअरमन म्हणून निवडून आले. तसेच सचिव म्हणून श्री. दिलीप चौधरी यांनी काम पाहिले. श्री. सुभाष पाटील यांनी त्यांच्या काळात इकॅम धुळे विभागाचे नाव बदलुन इकॅम धुळे नंदुरबार विभाग म्हणून मान्यता घेतली. त्यांनी संघटना मजबुतीसाठी खुप परीश्रम घेतलेत. तसेच धुळे रिजन स्थापन करण्या मध्ये कै. रघुनाथ भास्कर अहिरराव (नाना) यांचा मोलाचा वाटा होता व धुळे रिजन स्थापन करणे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांचा स्वप्नपूर्ती सत्कार गणेश मुर्ती भेट देवून करण्यात आला. GM ला जास्तीत जास्त परीश्रम घेवून जाहिराती व स्टॉल घेवून AGM चांगल्या प्रकारे केली. सर्व सभासदांना गिफ्ट देण्यात आलीत. तसेच सन २०१६ मध्ये विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला व सर्व शाळा व महाविद्यालयां मध्ये जनजागृती केली. व शहरात विद्युत सुरक्षिततेसाठी भव्य रॅली काढली, सन २०१८-१९ मध्ये श्री. रघुवीर पाटील यांची इकॅम महाराष्ट्र तर्फे नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर श्री. रघुवीर पाटील यांनी सलग सन २०१८-१९ ते २०२१- २०२२ पर्यंत चार वर्षे चेअरमन म्हणून काम पाहिले. त्या दरम्यान कोवीडचा काळ असल्यामुळे निवडणूक घेण्यात आली नाही. श्री. रघुवीर पाटील यांनी जोमाने काम करून सभासद संख्या वाढविली. सुरक्षा सप्ताह मध्ये सहभाग नोंदवून सभासदांमध्ये व जनतेमध्ये जनजागृती साठी धुळे शहरात, शाळा व महाविद्यालयांमध्ये सेमिनार घेतले व शहरात रॅली काढली. त्यांनी GM साठी मोठ्या जाहिराती व स्पॉन्सरशिप मिळवून AGM मोठ्या प्रमाणात साजरी केली. तसेच श्री. रघुवीर पाटील यांच्या काळात ६ लक्ष रुपये बचत करुन इकॅम धुळे नंदुरबार साठी डिपॉझीट ठेवले. त्यांना श्रीकांत अहिरराव, उपाध्यक्ष इकॅम धुळे, सचिव श्री. रविंद्र अहिरे व श्री. पंडीत व सर्व संचालक मंडळीने मोलाची साथ दिली.
सन २०२३ - २०२४ मध्ये श्री. प्रविण बडगुजर हे अध्यक्ष झाले त्यांनी विद्युत सुरक्षा व कर प्रणाली यावर सेमिनार घेतले. दिनांक २०/०४/२०२३ रोजी धुळे नंदुरबार विभागा तर्फे विद्युत सुरक्षा पुरवठा व कर प्रणाली बाबत सेमिनार घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. उल्हास वजरे साहेब व श्री. अरविंद गद्रे साहेब हे मुंबई हून वेळात वेळ काढून धुळे येथिल सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेत. त्यांनी विद्युत सुरक्षिततेसाठीचे नियम व त्यासाठी लागणारी आवश्यक ती काळजी कशी घ्यावी ? या बाबतची उपयुक्त अशी माहिती दिली व त्याबाबतचे बहुमुल्य मार्गदर्शन केले. तसेच धुळयाचे नामवंत कर सल्लागार श्री. राहुल मुंदडा सर यांनी नविन GST कराचे नियम व आपण व्यवसाय करतांना कोणती काळजी घ्यावी ? GST कराचे नियम काय आहेत ? सभासदांना काय अडचणी येवू शकतात ? यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सभासदांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देवून मार्गदर्शन केले. त्यावेळी इकॅम महाराष्ट्राचे संचालक, श्री. रेखे साहेब ( उपाध्यक्ष) व संचालक श्री. अमित गरुड उपस्थित होते. त्यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. या सर्व कार्यकमासाठी धुळे येथिल कॉन्ट्रॅक्टर श्री. नितीनजी अग्रवाल प्रोप्रा. समवील पॉवर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांनी स्वतःच्या गेस्ट हाऊस मध्ये हा कार्यकम स्वखर्चाने सर्व सभासदांना भोजन देवून केला, हया बद्दल धुळे नंदुरबार इकॅम तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच सन २०२२-२३ ची AGM मिटींग ही दिनांक १६/०९/२०२३ रोजी धुळे येथिल हॉटेल रेसिडेन्सी येथे घेण्यात आली. या वर्षीच्या AGM ला मुख्य प्रायोजक मे रोटोप्लॉस्ट वायर अॅण्ड केबल, यांचे मालक श्री. राहूल जैन, मुंबई व धुळे येथिल सभासद ठेकेदार श्री. जीजाबराव पवार मे. कालीका इंडस्ट्रीज व पार्थ इंडस्ट्रीज यांचे सह प्रायोजकत्व मिळाले. हया वेळच्या GM च्या सभेला सर्वात जास्त संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इकॅम महाराष्ट्र चे माजी अध्यक्ष दिवंगत श्री. सुनिल काका भुरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यकमाचे अध्यक्ष स्थानी नगरचे श्री. रेखे साहेब. उपस्थित होते. तसेच महासचिव देवांग ठाकूर, रावसाहेब रकिबे, शैलेंद्र गुजर, सचिन फडतरे, बाबूभाई मेहेन्दी, अमित गरुड इ. उपस्थित होते. AGM मध्ये सभासदांनी प्रश्न उपस्थित करुन त्यांना इकॅम महाराष्ट्र संचालक मंडळाने योग्य त्या प्रकारे, मार्गदर्शन करुन सभासदांचे समाधान केले. मा. सचिव इकॅम धुळे श्री. अनिल विश्वासराव पवार यांनी सर्वांचे आभार मानले. AGM अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्वानी स्नेह भोजनाचा आनंद घेतला व भेट वस्तु देण्यात आली.

धुळे रीजन पहिले अध्यक्ष कै. रघुनाथ (नाना ) भास्कर अहिरराव सन १९८६ सालापासून इकॅमचे सभासद असून गेल्या ३५ वर्षे परवाना धारक विद्युत ठेकेदार म्हणून कार्यरत होते. व ते आपल्या नाशिक व धुळे चेअरमन पदाच्या कार्यकाळात असतांना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सभासदांच्या अडचणींचे निराकारण केले. महावितरणमध्ये सभासदांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडली. एकत्र निविदा संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दखल करण्यात आली. सेवाकर जेव्हा विद्युत ठेकेदारावर लागु झाला त्यातील त्रुटी तसेच ठेकेदारांनी येत असणाऱ्या अडचणी मुंबई येथील सेवाकर कार्यालयांवर विद्युत ठेकेदार बंधुंना घेऊन मोर्चा काढण्यात आला. तसेच त्यांनी विद्युत ठेकेदारांसाठी भरपूर कामे केलीत. त्यांचा कार्यकाळ हा पुढील प्रमाणे संक्षिप्त देण्यात येत आहे.

DHULE NANDURBAR

DHULE NANDURBAR REGIONAL EXECUTIVE COMMITTEE

Name Designation Company Name Mobile No.
Shri Pravin Badgujar Chairman Pragati Engineering Works 9518572746
9423981945 .
Shri Kiran V. Pendarkar Vice-Chairman Veej Kamgar Sah. Soc. Ltd. 9422707337 .
Shri Anil V. Pawar Secretary Nayan Enterprises 9422782318
8206698277 .
Shri Ravindra D. Ahire Jt. Secretary & Treasurer Roshni Electric Works 9421533731
9284811540 .
Shri Rakesh D. Chaudhary Director Sadguru Pawar Engineering 9423023842 .
Shri B. M. Bhadane Director Vaishnavi Electric Works 8830753303 .
Shri Sunil B. Dahivekar Director Samarth Enterprises 9405863142 .
Shri Shrikant R. Ahirrao Co-opt Director Guruprasad Electricals 9422289941 .
Shri Nitin V. Agrawal Co-opt Director Samveel Power & Infrastucture Maryadit 9075999399 .
Shri Raghuveer J. Patil Past Chairman Swamiraj Industries 7972816622
9860086822 .
Shri Dilip R. Chaudhary Special Inviteetion National Electricals 9422288424 .
Shri Kishor S. Potdar Special Invitee Modern Engineering 9552502220 .
Shri Kashinath S. Patil Special Invitee Ishwar Electricals 9604578616 .
Shri Rais Ahmed Shaikh Haider Special Invitee Indian Elect. & Services 9422791686
8855951686 .
Shri Kamlesh Jain Special Invitee Sandeep Engineers 9422286180 .
Shri Umakant B. Shinde Special Invitee Deepdarshan Electricals 9421534914
9922226083 .
Shri Dilip M. Badgujar Advisor Sachin Vidyut Kamgar Sah. Soc. Ltd. 8830190345 .
Shri Chandrakant R. Chaudhary Advisor Chandrakant Veej Kamgar Sah. Soc. Ltd. 9423501519 .
Shri Jijabrao Pawar Advisor Jay Shri Krishna Enterprises 9822391120
ROLE OF HONOUR

CHAIRMAN

Sr. No. Name Years Profile
1 Shree Kai Raghunath Ahirrao 2014 - 2016
2 Shree Subhash Patil 2016 - 2018
<3/td> Shree Raghuveer Patil 2018 - 2022
4 Shree Praveen Badgujar Working since 2022

HONORARY SECRETARY

Sr. No. Name Years Profile
1 Shri. Chandrakant Choudhary 2014 - 2016
2 Shri. Dilip Choudhary Pope 2016 -2018
3 Shri. Anand Pandit 2018 - 2019
4 Shri Ravindra Ahire 2019 - 2022
5 Shri Anil Pawar working since 2022
GALLERY

Our GALLERY

Go To Top