AGM Meeting

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अहमदनगर विभागाची 25 वी वार्षिक सभा मोठ्या थाटामाटात पार पडली.
दिनांक ७ ऑक्टोबर 2023 रोजी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अहमदनगर विभागाची 25 वी वार्षिक सभा हॉटेल संजोग अहमदनगर येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी बारा वाजता झाली कार्यक्रमाचे ठिकाणी इलेक्ट्रिकल उत्पादनांचे प्रदर्शन भरण्यात आले होते त्यावेळी प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे श्री हापसे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी उपस्थित होते प्रदर्शनासाठी अडसूळ कॉलेज विखे पाटील कॉलेज छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच शासकीय तांत्रिक विद्यालयाचे विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट दिल्या सदरहू प्रदर्शनास 18 विविध कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांचे स्टॉल लावले होते त्यात प्रामुख्याने के ई आय इंडस्ट्रीज टू पावर काबिल प्रथमेश ट्रांसफार्मर विके आलो आईस कण्डक्टर सुजित इंडस्ट्रीज विशाल केबल आयडियल इंजिनिअरिंग गाला जॉईंट किट प्रोटोप लास्ट केबल इंटर केबल पावरट्रेक अर्थिंग श्री इंजिनिअरिंग सवेरा एलईडी मेघा इंजिनिअरिंग शिवचैतन्य सोलर तिरुपती एंटरप्राईजेस या कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात झाली यामध्ये सुप्रिया उगले जोशी मॅडम यांच्या नृत्यालयाच्या मुलींनी गणेश वंदना सादर केली त्याचबरोबर श्री संदीप भुसे सर यांच्या टीमने काही सुंदर गाणी गायली वरील सर्व कार्यक्रमास संघटनेची सभासद व त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली कार्यक्रमात रुद्र आणि गरुड कुस्ती या सभासदांच्या मुलींनी नृत्य सादर केली.व वार्षिक सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष श्री सुनील भुरे तसेच संघटनेची माजी संचालक बाळासाहेब आरडे व इतर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सभेचे अध्यक्ष स्थान श्री दत्ता झिंजुर्डे यांनी भुषवले सदर सभेसाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री वामन बुरे महाराष्ट्र राज्य महासचिव श्री देवांग ठाकूर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.उमेश रेखे, नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री सचिन फडतरे ,पुणे विभागाचे अध्यक्ष श्री अमर पाटील ,जळगाव विभागाचे अध्यक्ष श्री बाबू मेहदी ठाणे विभागाच्या अध्यय श्री निलेश तीवर मकर, धुळे विभागाच्या उपाध्यक्ष श्री किरण बेंढारकर नगर विभागाचे माजी अध्यक्ष श्री मनोहर शहाणे नगर व नगर विभागाचे सचिव श्री अर्जुन ससे उपाध्यक्ष श्री अमोल कोळपकर खजिनदार श्री बाळासाहेब दुकळे संचालक श्री संदीप डोळस श्री संभाजी निमसे श्री.जितेंद्र तोरणे ,श्री अनिल घाडगे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नगर विभागाचे सुमारे 200 सभासद सहकुटुंब सभेला उपस्थित होते.सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 25 वर्षानिमित्त 1995 पूर्वीचे ज्येष्ठ सभासद यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 25 व्या वर्षानिमित्त संघटनेतर्फे सुंदर अशी भेटवस्तू प्रत्येक सभासद असतानात आली 2023 ते 2026 या सालासाठी संचालक म्हणून श्री श्रीकांत देवडे व श्री राहुल सप्रे यांचे बिन विरोध निवड झाली श्री दत्ता झिंजुर्डे यांनी अध्यक्ष भाषण केले ,वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित गरुड यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अमोल कोळपकर यांनी केले व स्नेह भोजनाने सभेची सांगता झाली.. 🙏💐